चिंताजनक! ऋतूबदलानंतर वेगाने होऊ शकतो कोरोनाचा प्रसार, WHO च्या तज्ज्ञांची धोक्याची सुचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 02:24 PM2020-07-29T14:24:17+5:302020-07-29T14:29:34+5:30
CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी धोक्याची सुचना दिली आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरी काही राज्यांमध्ये मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी धोक्याची सुचना दिली आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस हा वातावरणातील बदलांमुळे जास्त प्रमाणात उद्भवत आहे. वातावरणात किंवा ऋतूत बदल झाल्याने कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी होईल या गैरसमजात राहू नका. जागतिक आरोग्य संघटनेचे मार्गरेट हॅरिस यांनी वर्चुअल ब्रिफींगदरम्यान सांगितले की, कोरोना व्हायरसच्या माहमारीची ही एक मोठी लाट आहे.
हॅरिस यांनी उत्तर गोलार्धातील देशांना कोरोनाच्या प्रसाराबाबत निष्काळजीपणा न करण्याची सुचना दिली होती. कोरोना व्हायरस हा इन्फ्लुएंजा व्हायरसप्रमाणे असून त्यामुळे वातावरणातील बदलांमुळे कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. असा गैरसमज न ठेवण्याचे सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी हाँगकाँगमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूला नियंत्रणात आणणं कठीण आहे. सगळ्यांनी एकत्र मिळून या संकटाचा सामना केला तर कोरोनाचा होणारा प्रसार रोखता येऊ शकतो.
हॅरिस यांनी सांगितले की, सध्या आपण कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेशी लढा देत आहोत. कोरोनाच्या या लाटेचा आलेख वरून खालच्या दिशेने यात आहे. आपण या वक्राला सपाट करू शकू शकतो. गरमीच्या वातावरणात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता धोक्याचा इशारा देत हॅरिस यांनी सांगितले की, सध्या जास्त सावधगिरी बाळगणं आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. याशिवाय लोकांना एकत्र टाळायला हवं असे सांगितले आहे.
पुढे हॅरिस यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसकडे आजसुद्धा हवामानातील बदलांमुळे उद्भवलेल्या आजाराच्या दृष्टीने पाहिले जाते. पण कोरोना विषाणू हा प्रत्येक वातावरणात सोबत राहणार आहे. दक्षिण गोलार्थातील हिवाळ्याच्या वातावरणादरम्यान कोरोना विषाणूंचा प्रसार वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर तुम्हाला श्वासांसंबंधी काही समस्या आधीपासूनच जाणवत असतील तर कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
CoronaVirus News : अमेरिकन कंपनीची कोरोनाची लस खिशाला कात्री लावणार; जाणून घ्या किंमत
युद्ध जिंकणार! कोरोनाशी लढण्यासाठी १ नाही तर २ लसींसह सज्ज आहेत 'हे' देश, जाणून घ्या कोणते