WHO चा धोक्याचा इशारा; पुढच्या २ आठवड्यात रोज १ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:09 AM2020-06-16T11:09:11+5:302020-06-16T11:19:59+5:30
CoronaVirus News Updates : WHOने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन आठवड्यात रोज एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत. तसंच आता पुढील पंधरा दिवस रुग्णांची संख्या याच वेगाने वाढू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा वाढता प्रसार पाहता धोक्याची सुचना दिली आहे. आशिया, दक्षिण अमेरिका आणि मिडल ईस्टमधील देशांमध्ये कोरोनांचं संक्रमण वेगाने पसरत राहणार आहे. WHOने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन आठवड्यात रोज एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत. तसंच आता पुढील पंधरा दिवस रुग्णांची संख्या याच वेगाने वाढू शकते. बिजिंगमध्ये कोरोना विषाणूं पसरण्याचं प्रमाण वाढत आहे. यातून लवकरात लवकर बाहेर येण्याासाठी मार्ग शोधायला हवा. असं WHOने चीनला सुचना देताना म्हटलं आहे.
WHO चे प्रमुख टेडरॉस एडहॉम यांनी सांगितले की, ५० दिवसांनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा गंभीर स्थिती दिसून येत आहे. बिजिंगमध्ये वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सावध राहायला हवं. WHO चे आपातकालीन व्यवस्थेचे प्रमुख मायकल रेयान यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र हेल्थ एजेंसीसुद्धा बिजिंगमध्ये पसरत असलेल्या संक्रमणाच्या मुद्द्यावरून चीनच्या संपर्कात आहे. जर चीनला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज भासली तर WHO ची टीम चीनमध्ये पाठवण्यात येणार आहे. १० देशांतून ८० टक्के नवीन केसेस समोर येत आहेत.
टेडरॉस यांनी सांगितले की जगभरात कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत आहे. त्यातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण हे १० देशातील आहे. त्यातील सगळ्यात जास्त रुग्ण ब्राजील, अमेरिका, भारत, रूस, पेरू, चिली, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधून दिसून येत आहेत. दक्षिण आशियाई देशात कोरोनाचा प्रसार वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर होत आहे.
आफ्रिकेत ही माहामारी वेगाने पसरू शकते
WHO ने दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकेत कोरोनाच्या माहामारीचा वेगाने प्रसार होत आहे. WHO चे आफ्रिकेचे प्रमुख माशिदिसो मोइती यांनी सांगितले की, आफ्रिकेतील ५४ देशांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त सामुहिक संक्रमण होण्याला सुरूवात झाली असून ही गंभीर स्थिती आहे. युरोपातून शिरकाव झाल्यानंतर शहरी भागात, व्यावसाईक केंद्रामध्ये, ग्रामीण भागात हा विषाणू पसरत गेला आहे.
मोइती यांनी सांगितले की, कोरोना विषाणूची लस जोपर्यंत उपलब्ध होत नाही. तोपर्यंत कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. आफ्रिकेत सध्या कोरोनाच्या संक्रमणाचे २ लाख ५४ हजार केसेस समोर आल्या आहेत. तर ६ हजार ७०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिलासादायक! कोणत्याही साईड इफेक्टशिवाय चीनच्या 'या' लसीने कोरोनाला हरवता येणार; तज्ज्ञांचा दावा
डिप्रेशनला बळी पडला होता सुशांत सिंह राजपूत; जाणून घ्या या डिप्रेशनची लक्षणं आणि उपाय