Coronavirus: काय सांगता! पुढील २ वर्ष तुम्हाला सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावंच लागेल, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 02:40 PM2020-06-01T14:40:27+5:302020-06-01T14:43:03+5:30
व्हायरस विरूद्ध युद्धाचा हा पहिला टप्पा आहे. येणाऱ्या काळात बरीच आपत्ती लोकांसमोर येऊ शकते
नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. आतापर्यंत ६३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर साडेतीन लाखांपर्यंत लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना सध्यातरी सोशल डिस्टेंसिंगच पालन करावं लागत आहे. पण जगाला पुढील २ वर्ष म्हणजे २०२२ पर्यंत या कडक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या संदर्भात बरीच संशोधने पुढे येत आहेत.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की व्हायरस विरूद्ध युद्धाचा हा पहिला टप्पा आहे. येणाऱ्या काळात बरीच आपत्ती लोकांसमोर येऊ शकते. व्हायरसचा प्रभाव कमकुवत झाल्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले असले तरी थोडाशाही निष्काळजीपणा पुन्हा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरु शकेल. त्यामुळे कोट्यवधी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. डॉ. आयुष पाडे यांच्या मते, सोशल डिस्टेंसिंग हा एकमेव उपाय आहे ज्यामुळे वृद्ध, मुले आणि ज्यांची रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता कमी असणार्या लोकांसाठी फायदेशीर आहे.
हॉवर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून उघड
नुकतेच अमेरिकेच्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे संशोधन सायन्स जर्नल या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. विद्यापीठाच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांना गंभीर शंका आहे की, या काळात लॉकडाऊन नियम थोडेसे शिथिल केले तर विषाणूचा परिणाम पुन्हा गंभीर रूपात समोर येऊ शकतो. त्याचा मानवी जीवनाला धोका निर्माण होईल. कोरोनाचं संकट पुन्हा उभं राहिलं.
६ महिन्यांची कडक खबरदारी, २ वर्ष सोशल डिस्टेंसिंगचा नियम आवश्यक
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, व्हायरस इन्फ्लूएन्झा सारख्याच जगात जगेल. अशा परिस्थितीत किमान ६ महिने बरीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त लोकांनी किमान २ वर्षे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे लागेल असा त्यांनी आपल्या संशोधनात असा दावाही केला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने लॉकडाऊन रोखण्यात कोरोना व्हायरस यशस्वी झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी किमान २ आठवडे थांबायला सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे उद्भवू न शकल्यास लॉकडाऊन नियम शिथिल केले पाहिजेत.
हॉवर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मत आहे की, जोवर लस तयार होईपर्यंत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्या मते,लस तयार होण्यासाठी किमान २ वर्षे लागू शकतात परंतु सामाजिक अंतरांसारख्या नियमांचे पालन करून आपल्याला जीवन जगणे बंधनकारक करावे लागेल.
तसेच कोरोना विषाणू देखील वेळोवेळी स्वत: मध्ये बदल घडवून आणतो, ही एक अतिशय धोकादायक स्थिती आहे. अशा परिस्थितीत, लस बनवणे अधिक क्लिष्ट होऊ शकते. याचे मुख्य कारण असे आहे की, कोरोना संक्रमित रूग्णात अनेकदा लक्षणे दिसू लागतात, तर अनेकांमध्ये लक्षणं आढळत नाहीत. अशा परिस्थितीत स्वतः कोरोना विषाणूवरील संशोधनात शास्त्रज्ञ अजूनही संभ्रमावस्थेत आहेत असं हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
वरात घेऊन नवरदेव आला दारी; पण नवरीच्या ‘त्या’ हट्टापायी पुन्हा परतला माघारी, मग...
…म्हणून चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज; ट्रम्प यांची काय आहे ‘जी ७’ रणनीती?
निर्दयी! ९ महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू; मृतदेह सोडून पळाले आई-वडील
१ ते ७ जून दरम्यान लोकांनी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; केंद्र आणि राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वं
७ दिवस अन् १ रस्ता, भारताचं सोनं लुटण्याची चीनने केली तयारी; लडाखमध्ये दडलाय मोठा खजिना!