Coronavirus: कोरोनानंतरच्या पुढील महामारीत अँन्टिबायोटिक्स औषधांचा उपयोग नाही; वैज्ञानिकांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:23 PM2021-06-21T23:23:50+5:302021-06-21T23:25:10+5:30

काही बॅक्टेरिया असे आहेत की त्यावर अँन्टिबायोटिक्स औषधांचा प्रभाव चालत नाही. पुढील महामारी बॅक्टेरिया संबंधित असू शकते.

Coronavirus: The next pandemic could well be bacterial in antibiotic resistance | Coronavirus: कोरोनानंतरच्या पुढील महामारीत अँन्टिबायोटिक्स औषधांचा उपयोग नाही; वैज्ञानिकांचा खुलासा

Coronavirus: कोरोनानंतरच्या पुढील महामारीत अँन्टिबायोटिक्स औषधांचा उपयोग नाही; वैज्ञानिकांचा खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देहे आजार जगातील कोणत्याही देशात कोणत्याही कोपऱ्यात पसरू शकतात. अँन्टिबायोटिक्स औषधं बनवणाऱ्या कंपन्यांनी त्याच्या औषधांवर पुन्हा फेरचाचणी करून त्यांची ताकद वाढवावी. या आजारावर कोणतंही औषधं उपयोगी न ठरल्याने तो आणखी धोकादायक बनू शकतो.

अँन्टिबायोटिक औषधं आधुनिक आरोग्य पद्धतीत सर्वात मोठा शोध आहे. ही पद्धत लाखो-करोडो लोकांचे जीव वाचवते. परंतु पुढील महामारी अशी असेल ज्यावर अँन्टिबायोटिक, अँन्टिमाइक्रोबियल, अँन्टिबॅक्टिरियल औषधांचा काहीच परिणाम होणार नाही असा खुलासा एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. म्हणजे मानव सध्या अशा टाइमबॉम्बसोबत जगत आहे जो कधीही फुटू शकतो.

अँन्टिबायोटिक्स(Antibiotics) म्हणजे काय?

हा एक अँन्टिमाइक्रोबिय पदार्थ असतो तो बॅक्टेरियाच्या विरोधात लढतो. हा कोणत्याही प्रकारच्या व्हायरससोबत लढण्यास सक्षम असतो. अँन्टिबायोटिक औषधांचा वापर शरीरात सुक्ष्म जीवांच्या सहाय्याने पसरणाऱ्या संक्रमणाला रोखण्यास प्रभावी ठरतो. जेणेकरून शरीरात व्हायरस विकसित होऊ नये आणि तो संपुष्टात यावा. अँन्टिबायोटिक्सची ताकद आणि सहजपणे उपलब्ध होत असल्याने जगभरात या पद्धतीला मानलं जातं. परंतु खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर होऊ लागला आहे. काही बॅक्टेरिया असे आहेत की त्यावर अँन्टिबायोटिक्स औषधांचा प्रभाव चालत नाही. पुढील महामारी बॅक्टेरिया संबंधित असू शकते. त्यामुळे सध्या अँन्टिबायोटिक्स विरोधी आजारांबद्दल जगभरातील वैज्ञानिक चिंतेत आहेत. ही समस्या मोठी होऊन समोर येत आहेत.

जागतिक आरोग्य संघटना(WHO)ने अँन्टिमाइक्रोबियल रजिसटेंसला जागतिक धोका म्हटलं आहे. संघटनेचं म्हणणं आहे की, भविष्यात अशा आजार गंभीर होऊ शकतात. आतापासून याला सुरुवात झाली आहे. हे आजार जगातील कोणत्याही देशात कोणत्याही कोपऱ्यात पसरू शकतात. कोणत्याही वयोगटातील लोक याला बळी पडू शकतात. या आजारावर कोणतंही औषधं उपयोगी न ठरल्याने तो आणखी धोकादायक बनू शकतो. डच बायोटेक, लाइफ सायन्स संस्थेचे एमडी एनीमीक वर्कामैन सांगतात की, अँन्टिबायोटिक्स विरोधी आजार मोठा धोका आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी हा एक इशारा आहे. पुढील महामारी बॅक्टेरियासंबंधित असेल. काही औषध कंपन्या त्यांच्याकडून अँन्टिबायोटिक्स बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात हा आजार पसरल्यास त्याला रोखण्यासाठी ही औषधं पुरेसी नाहीत.

अँन्टिबायोटिक्स औषधं बनवणाऱ्या कंपन्यांनी त्याच्या औषधांवर पुन्हा फेरचाचणी करून त्यांची ताकद वाढवावी. किंवा उत्पादन कंपन्यांनी असं तत्व बनवावं जे अँन्टिबायोटिक्स विरोधी आजार समजू शकत नाही आणि नष्ट होईल. केव्हाही असं औषध बनल्यास तात्काळ क्लिनिकल ट्रायलला पाठवून मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन करण्याची क्षमता ठेवावी लागणार आहे. बेल्जियममध्ये काही संशोधक यावर रिसर्च करत आहेत.  

Web Title: Coronavirus: The next pandemic could well be bacterial in antibiotic resistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.