कोरोना रुग्णांची खोली आणि गर्दीपेक्षाही जास्त धोकादायक आहे; 'हे' ठिकाण, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 01:22 PM2020-06-04T13:22:16+5:302020-06-04T13:25:00+5:30
कोरोना रुग्णांची खोली आणि गर्दीच्या ठिकाणांपक्षाही एक असं ठिकाण आहे जे संक्रमणाचं कारण ठरत असतं.
भारतात कोरोना व्हायरसची लागण होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे कोरोना विषाणूंची संख्या वाढतेय की काय अशी भीती सगळ्यांचाच मनात आहे. अशा स्थितीत जगभरातील तज्ज्ञ आणि WHO कडून वेगवेगळे उपाय सुचवले जात आहेत. एका अभ्यासानुसार कोरोना रुग्णांची खोली आणि गर्दीच्या ठिकाणांपक्षाही मोकळी आणि खेळती हवा नसलेलं बाथरूम धोकादायक असू शकतं.
द लेसेस्टमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे वुहानमधील संशोधकांनी हे स्पष्ट केले आहे की, एखाद्या खोलीत जर खिडकी नसेल तर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आहे अशा ठिकाणी व्हेंटिलेशन आणि सॅनिटायजेशनकडे लक्ष द्यायला हवं. इतकंच नाही तर ज्या बाथरूमध्ये व्यवस्थित हवा खेळती राहण्यास जागा नसेल तिथे संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. मोकळी हवा नसलेल्या बाथरूमध्ये कमी वेळातच लोकांना संक्रमणाचं शिकार व्हावं लागू शकतं.
या संशोधनात नेजल स्प्रेच्या मदतीने लाळेच्या थेंबांची चाचणी करण्यात आली होती. यात असं दिसून आलं की, खिडकी किंवा दरवाजा उघडा आणि हवेशीर असेल तर एअरोसेल्स दूर होतात. तसंच तर व्हेंटिलेशल नसेल तर एअरोसेल्स तसेच राहतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो.
बचावासाठी उपाय
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी जाताना मास्क घालून मग जायला हवं. त्यामुळे इन्फेक्शन टळणार नाही तर धोका कमी होऊ शकतो.
मास्क वापरायला हवा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं.
सतत हात धुवायला हवेत.
तोंडाला सतत स्पर्श करू नये.
खोकताना किंवा शिंकताना टिश्यूचा वापर करावा.
पावसाळ्यात वेगाने वाढत आहे कोरोनाचा धोका; इन्फेक्शन रोखण्यासाठी वापरा 'हा' रामबाण उपाय
प्रायव्हेट पार्ट्सवर तीव्रतेने खाज येण्याची 'ही' असू शकतात कारणं; 'अशी' घ्या काळजी