Corona Virus : कोरोना महामारी आता संपली आहे का? WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:30 PM2022-02-11T16:30:48+5:302022-02-11T16:37:19+5:30

Corona Virus : सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या व्हायरसची उत्पत्ती आणि त्याच्या प्रसाराची कारणे याबद्दल अभ्यास सुरू आहेत. याबाबत सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

coronavirus not ruled out who scientist soumya swaminathan on wuhan lab leaking theory  | Corona Virus : कोरोना महामारी आता संपली आहे का? WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

Corona Virus : कोरोना महामारी आता संपली आहे का? WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

Next

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की, महामारी आता संपली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी इशारा देत मोठे विधान केले आहे. 'काही लोक वेळोवेळी घोषणा करत आहेत की, कोरोना महामारी संपली आहे. तर हे योग्य नाही. सध्या महामारी संपली असे कोणीही म्हणू शकत नाही. ती कधी संपेल हेही सांगता येत नाही.

त्यामुळे कोरोना महामारी संपल्याबद्दल बोलून अशा गोष्टींवर विसंबून राहून सर्व सावधगिरी सोडणे अत्यंत मूर्खपणाचे ठरेल. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (New Corona Variant) कुठेही, कधीही उद्भवू शकतो आणि आपण वळसा घालून चौरस्त्याच्या त्याच कोपऱ्यात पोहोचू शकतो जिथून आपण सुरुवात केली होती. त्यामुळे अजूनही अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे', असे सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. 

ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, 'जगात कोरोनाचे जेमतेम 100 रुग्ण होते, तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता. मात्र त्यानंतर हा इशारा कोणीही गांभीर्याने घेतला नाही. मौल्यवान वेळ वाया गेला. यानंतर अमेरिका  (USA) आणि युरोपमध्ये (Europe) कशा प्रकारचा विध्वंस झाला ते पाहिले. आपल्या एका लहान निष्काळजीमुळे तो भयानक काळ परत आणू शकतो. आफ्रिकन देशांतील 85 % लोकांना अजूनही कोरोना लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

ही परिस्थिती कोरोनाचे नवीन व्हेरिएंट निर्माण आणि पसरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. आपल्याला दीर्घकाळ कोरोनाशी संबंधित खबरदारीचे पालन करावे लागेल. कोरोना आणि त्याच्याशी निगडीत या खबरदारीसोबत जगायला शिकले पाहिजे. सध्या नाही, पण 2022 पर्यंत आपण अधिक चांगल्या स्थितीत असू. त्यावेळी हा व्हायरस आता कोणत्या स्थितीत आहे आणि तो किती काळात संपू शकतो हे आम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकू, असे  सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. 

चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना आला हे नाकारता येत नाही, पण.. 
सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या व्हायरसची उत्पत्ती आणि त्याच्या प्रसाराची कारणे याबद्दल अभ्यास सुरू आहेत. याबाबत सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. चीनच्या वुहान लॅबमधून (Wuhan Lab Of China) कोरोना व्हायरस लीक झाल्याचा हा सिद्धांतही पूर्णपणे नाकारला गेला नाही. या प्रकरणी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की विषाणूची उत्पत्ती इतक्या सहज आणि लवकर सापडत नाही.

सार्स (SARS) प्रत्यक्षात Civet Cat पासून आला होता, हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना वर्षानुवर्षे लागली. त्याचप्रमाणे, एमईआरएस (MERS) उंटांपासून आणि एचआयव्ही (HIV) चिंपांझीपासून आला हे कळायला अनेक वर्षे लागली. जोपर्यंत कोरोनाचा सवाल आहे, तर त्याबाबत आतापर्यंत असे दिसून येते की, हा वटवाघळांपासून (BAT) आला आहे. पण तो मानवापर्यंत कसा पोहोचला, हे अद्याप कळलेले नाही.
 

Web Title: coronavirus not ruled out who scientist soumya swaminathan on wuhan lab leaking theory 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.