CoronaVirus : लठ्ठपणाचे शिकार असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो? वाचा रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 09:50 AM2020-04-20T09:50:19+5:302020-04-20T10:00:43+5:30
या रिसर्चनुसार ३० पेक्षा कमी बीएमआय असलेल्या रुग्णांच्या तुलनेत ३० ते ३४ बीएमआय असलेल्या लोकांना संक्रमण होण्याची शक्यता दुप्पट होती.
दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा प्रसार जगभरात वाढत आहे. या महामारीमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. चीननतंर, इटली, अमेरिका, स्पेनसह भारतातसुद्धा कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहेत. दरम्यान ज्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्याठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे.
सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं कोरोनाची ही लक्षणं तुम्हाला माहीत असतील. या लक्षणांव्यतिरिक्त वेगळी लक्षणं दिसायला सुरूवात झाली आहे. सध्या अमेरिकेत झालेल्या संशोधनात असं दिसून आलं, लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका जास्त आहे.
न्यूयॉर्कमधील एका हॉस्पिटलमध्ये ३ हजार ६१५ लोक भरती झाले होते. या रुग्णांवर हा रिसर्च करण्यात आला होता. ऑक्सफोर्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार लठ्ठपणाने त्रस्त असलेले लोक मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे शिकार आहेत. हा रिसर्च रुग्णांच्या बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्सच्या आधारावर तयार करण्यात आला होता.
या रिसर्चनुसार ३० पेक्षा कमी बीएमआय असलेल्या रुग्णांच्या तुलनेत ३० ते ३४ बीएमआय असलेल्या लोकांना संक्रमण होण्याची शक्यता दुप्पट होती. रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या १६ टक्के लोकांचा बीएमआय ३५ पेक्षा जास्त होता. ३७ टक्के लोक ओव्हर वेटमुळे कोरोना पॉजिटिव्ह आले होते. बॉडी मास इंडेक्समध्ये शरीराच्या उंचीनुसार वजन योग्य आहे की नाही हे पाहिलं जातं. साधारण बीएमआय २२.१ पेक्षा जास्त असू नये. ( हे पण वाचा-घाम आणि घामोळ्यांनी हैराण असाल, तर घरच्याघरी 'या' थंडगार पेयांनी नेहमी कूल रहा)
वयस्कर आणि आधीपासून आजारी असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे. असं या रिसर्चमध्ये दिसून आलं. यानुसार ६० वयापेक्षा जास्त असलेले लोक कोरोना व्हायरसचे शिकार होते. भारतात सुद्धा वयस्कर लोकांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली आहे. लंडनच्या इंपीरियल कॉलेजचे श्वसन रोगतज्ञ प्रो. फॅन चुंग यांच्यामते फुप्फुस, किडनी, डायबिटीस आणि अस्थमाचा आजार असलेल्या लोकांमध्ये संक्रमणाचा धोका जास्त असतो. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन यांनी दिलेल्या अहवालानुसार मृत्यू झालेल्या लोकांमध्ये महिलांपेक्षा पुरूषांचं प्रमाण जास्त होतं. ( हे पण वाचा -CoronaVirus : कोरोनाच्या महामारीमुळे लोकांमध्ये झाले आहेत 'हे' बदल)