Coronavirus : जास्त वजन असलेल्यांना कोरोनाने मृत्युचा धोका तीन पट अधिक - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 04:41 PM2020-07-25T16:41:30+5:302020-07-25T16:41:39+5:30

कोरोनाने आजारी पडल्यावर ओव्हरवेट लोकांसाठी व्हेंटिलेटरची गरजही ७ पटीने अधिक असतो. बॉडी मास इंडेक्स २५ च्या वर झाल्यावर समजलं जातं की, व्यक्तीचं वजन अधिक आहे.

Coronavirus : Overweight people three times likely to die of Covid 19 | Coronavirus : जास्त वजन असलेल्यांना कोरोनाने मृत्युचा धोका तीन पट अधिक - रिसर्च

Coronavirus : जास्त वजन असलेल्यांना कोरोनाने मृत्युचा धोका तीन पट अधिक - रिसर्च

Next

कोरोना व्हायरससंबंधी वेगवेगळ्या रिसर्चमधून अजूनही नवी माहिती समोर येत आहे. रोज समोर येणाऱ्या माहितीने चिंताही वाढत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसने जास्त वजन असलेल्या लोकांना मृत्यूचा धोका हेल्दी लोकांच्या तुलनेत तीन पटीने अधिक असतो. ब्रिटनची सरकारी एजन्सी पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या रिपोर्टमध्ये या गोष्टीचा खुलासा करण्यात आलाय.

कोरोनाने आजारी पडल्यावर ओव्हरवेट लोकांसाठी व्हेंटिलेटरची गरजही ७ पटीने अधिक असतो. बॉडी मास इंडेक्स २५ च्या वर झाल्यावर समजलं जातं की, व्यक्तीचं वजन अधिक आहे. अशा लोकांसाठीही व्हेंटिलेटरची गरज वाढू शकते. पण बॉडी मास इंडेक्स ३० ते ३५ झाल्यावर कोरोनाने मृत्यू होण्याचा धोका ४ टक्के अधिक वाढतो.

रिपोर्टनुसार, बॉडी मास इंडेक्स २५ च्या पर राहिल्यावर कोरोनाने गंभीर आजारी पडण्याचा धोका दुप्पट होतो आणि मृत्यूचा धोका ३ पटीने अधिक वाढतो. व्हेंटिलेटरची गरज पडण्याचा धोका सात पटीने अधिक वाढतो. असं असलं तरी अधिक वजनाने कोरोनाने संक्रमित होण्याचा धोका वाढत नाही. ओव्हरवेट लोकांबाबत डॉक्टरांचं मत आहे की, व्यक्ती आपलं वजन जेवढं कमी करेल त्यांना कोरोनाचा धोका तेवढा कमी होईल.

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या रिपोर्टमध्ये आढळून आले की, अधिक फॅट असल्याने रेस्पिरेटरी सिस्टीम प्रभावित होते आणि याने शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर प्रभाव पडतो. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान  बोरिस जॉनसन म्हणाले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लहरीची शक्यता बघता लोकांनी आपलं वजन कमी केलं पाहिजे.

काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे की, लॉकडाऊनमुळे लोक स्नॅक्स अधिक खात आहेत आणि एक्सरसाइज कमी करत आहेत. ब्रिटनमध्ये दोन तृतियांश लोकांचं वजन अधिक आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनाने ४५,७०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. आणि यामागे लठ्ठपणा हे कारण असू शकतं.

हे पण वाचा :

Coronavirus: फिल्टर फेस मास्क घालणं धोकादायक ठरु शकतं?; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा

संसर्गापासून बचावासाठी फळं आणि भाज्या धुण्याची योग्य पद्धत कोणती? WHO, CDC दिल्या 'या' गाईडलाईन्स

Web Title: Coronavirus : Overweight people three times likely to die of Covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.