हवेमार्फत किती अंतरापर्यंत होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग? जाणून घ्या बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:52 PM2020-07-08T13:52:35+5:302020-07-08T13:54:31+5:30

CoronaVirus : अनेक देशांमध्ये कोरोना साथीने पुन्हा जोर पकडल्यावरून याचा प्रसार हवेतूनही होत असावा, अशी शंका अनेक वैज्ञानिकांनी पत्र पाठवून व्यक्त केली होती.

Coronavirus pandemic how far can covid 19 sars virus spread in air prevention and precaution tips | हवेमार्फत किती अंतरापर्यंत होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग? जाणून घ्या बचावाचे उपाय

हवेमार्फत किती अंतरापर्यंत होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग? जाणून घ्या बचावाचे उपाय

Next

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना विषाणूंचे संक्रमण हवेतून पसरतं असा दावा तज्ज्ञांनी केला होता. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना साथीने पुन्हा जोर पकडल्यावरून याचा प्रसार हवेतूनही होत असावा, अशी शंका अनेक वैज्ञानिकांनी पत्र पाठवून व्यक्त केली असली तरी अशा संसर्गाचे ठोस पुरावे अजून तरी समोर आलेले नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. वैज्ञानिकांच्या पत्राविषयी संघटनेच्या संसर्गविषयक तज्ज्ञ डॉ. बेनेडेट्टा अ‍ॅलेग्रान्झी म्हणाल्या की, हा निष्कर्ष ज्या गृहितकांवर काढला आहे त्याला सबळ आधार नाही. 

एका संशोधनानुसार कोविड 19 ने संक्रमित व्यक्ती एखाद्या ठिकाणाहून वावरत असेल तर कोरोनाचं संक्रमण हवेत पसरण्याचा धोका असतो. वातावरणात असलेल्या व्हायरसच्या ड्रॉपलेट्समुळे इतरांना संक्रमण पसरू शकतं. त्यामुळे सध्या धोका वाढला आहे.  कॅलिफोर्निया सॅन डिएगो यूनिवर्सिटीतील  शोधकर्त्यांनी  वुहान, न्यूयॉर्क आणि इटलीतील माहितीवर संशोधन केले होते. वातावरणात असलेले संक्रमण साधारणपणे एयरोसॉलद्वारे  पसरते. या संशोधनात नोबेल विजेता मारियो जे मोलिना यांचा समावेश होता. 

हवेत किती दूरपर्यंत पसरू शकतो कोरोना

हवेत कोरोना किती दूरपर्यंत पसरू शकतो. याबाबत तज्ज्ञांना कोणताही ठोस पुरावा सापडलेले नाही. पण एखादया व्यक्तीच्या शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर लाळेतून निघत असलेल्या ड्रॉपलेट्समधून कोरोना विषाणूंचे संक्रमण हवेत पसरू शकतं. १ मीटर ते ६ मीटरपर्यंत हे संक्रमण पसरू शकतं.  याबाबत डॉक्टरांनी सहमती दर्शवलेली नाही. रुग्णालयात, स्वतःच्या खोलीत किंवा रस्त्यावर, संक्रमित व्यक्ती कोणत्या ठिकाणी असतेत्यावरून संक्रमण पसरण्याची स्थिती अवलंबून असते. शक्यतो मोकळ्या जागी संक्रमण पसरण्याचा धोका कमी असतो. 

त्यासाठी घरातून बाहेर निघताना मास्क लावणं गरजेचं आहे. तसंच कारण नसताना घराच्या बाहेर पडू नये. बाहेर निघाल्यानंतर सोशल डिस्टेंसिंगचं पालन करायला हवं. कारण जर कोरोनाचा प्रसार हवेतून होत असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं धोक्याचं ठरू शकते. एन ९५ मास्कचा वापर करा. जेणेकरून लाळेच्या थेबांद्वारे पसरत असलेल्या संक्रमणाचा सामना  करावा लागणार नाही. हवेतून होत असेलल्या संसर्गापासून लांब राहण्यासाठी कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी जाणं टाळा, एसीचा वापर करू नका. घरी कोरोना रुग्ण असल्यास बाथरूम आणि कोरोना रुग्णांची खोली स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. 

रोजच्या वापरातील 'या' वस्तूंमुळे होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या बचावाचे उपाय

अभिमानास्पद! 'या' व्यक्तीवर होणार भारतातील कोरोना लसीचे पहिले परिक्षण; जाणून घ्या प्रक्रिया

Web Title: Coronavirus pandemic how far can covid 19 sars virus spread in air prevention and precaution tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.