Coronavirus : चिंताजनक! 'या' लोकांना रिकव्हरीनंतरही पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण, वाचा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 10:40 AM2020-06-27T10:40:44+5:302020-06-27T10:48:05+5:30

तुमची कोरोना व्हायरसची टेस्ट निगेटिव्ह आल्यावर तुम्ही बरे झाले असाल तरी सुद्धा तुम्ही नंतर पॉझिटीव्ह आढळू शकता. यामागचं कारण वाचून तुम्ही हैराण व्हाल. चला जाणून घेऊन यामागचं कारण...

Coronavirus : Patients with hypertension may be likely to test again positive after recovery says research | Coronavirus : चिंताजनक! 'या' लोकांना रिकव्हरीनंतरही पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण, वाचा कारण...

Coronavirus : चिंताजनक! 'या' लोकांना रिकव्हरीनंतरही पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण, वाचा कारण...

Next

काही आजार असे असतात ज्यातून तुम्ही एकदा बरे झाल्यावरही त्याची लागण पुन्हा होऊ शकते. असाच आजार म्हणजे कोरोना व्हायरस. जर तुम्ही हा विचार करून आनंदी आहात की, तुम्ही आता कोरोनातून बरे झालात आणि पुन्हा तुम्हाला होणार नाही. तर तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण कोरोना व्हायरसला नष्ट करणारी कोणतीही वॅक्सीन अजून तयार झालेली नाही. हेच कारण आहे की, यातून बरे झाल्यावरही तुम्ही यापासून पूर्णपणे सुरक्षित नाहीत असा दावा काही रिसर्चमधून करण्यात आला आहे. एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जर तुम्ही हायपरटेंशन किंवा हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयरोगाचे रूग्ण असाल तर तुम्हाला कोरोनातून रिकव्हरीनंतरही याची पुन्हा लागण होण्याची शक्यता अधिक आहे. 

इतकेच काय तर तुमची कोरोना व्हायरसची टेस्ट निगेटिव्ह आल्यावर तुम्ही बरे झाले असाल तरी सुद्धा तुम्ही नंतर पॉझिटीव्ह आढळू शकता. यामागचं कारण वाचून तुम्ही हैराण व्हाल. चला जाणून घेऊन यामागचं कारण...

साधारणपणे अनेक व्हायरल आजार येतात आणि जातात. पुन्हा त्या आजारांनी संक्रमित होण्याची शक्यता कमी असते. कारण शरीर आजार निर्माण करणाऱ्या व्हायरस विरोधात अॅंटीबॉडी तयार करतं. पण COVID-19 त्या सर्वांपेक्षा वेगळा आहे. काही केसेसमध्ये रिकव्हरीनंतरही व्यक्ती कोरोनाने पॉझिटीव्ह आढळून आलाय. त्यासोबतच हृदयरोग आणि हाय बीपी असलेल्यांना याचा धोका अधिक आहे. असं आढळून आलं आहे की, या रूग्णांमध्ये कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह असण्याचा धोका अधिक असू शकतो.

काय आहे याचं कारण?

चीनच्या हुजहोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीच्या एका रिसर्च टीमने 900 पेक्षा अधिक कोरोना रूग्णांच्या डेटाचा अभ्यास केला. जेणेकरून काही लोक पुन्हा पॉझिटीव्ह झाल्यामागचं कारण समजू शकेल. या रिसर्च दरम्यान त्यांना आढळून आलं की, यातील जवळपास 6 टक्के रूग्ण पुन्हा पॉझिटीव्ह होत आहेत. नंतर वैज्ञानिकांनी या रूग्णांची मेडिकल हिस्ट्री आणि इतर माहिती गोळा केली. त्यावर अभ्यास केला. तेव्हा त्यांना आढळून आलं की,  COVID-19 ने पुन्हा पॉझिटीव्ह होण्याचं आणि क्लीनिकल लक्षणांमध्ये संबंध आहे.

(Image Credit : nationalheraldindia.com)

वैज्ञानिकांना या रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, हायपरटेंशन किंवा हाय ब्लड प्रेशरसोबत COVID-19 पॉझिटीव्ह होणाऱ्या लोकांना रिकव्हरीनंतरही पॉझिटीव्ह येण्याची शक्यता होती. या रिसर्चमधून वृद्ध आणि आजारी लोकांबाबत चिंता व्यक्ती करण्यात आली आहे. टीमकडून जारी करण्यात आले की, '50 वर्षे वयापेक्षाच्या अधिक रूग्णांमध्ये जे रूग्ण पुन्हा पॉझिटीव्ह आढळले ते कोरोनरी आर्टरी डिजीज आणि हायपरटेंशनचे रूग्ण होते'.

तसेच एक बाजू अशीही समोर आली आहे की, हा व्हायरस फुप्फुसांमध्ये असू शकतो, जो टेस्टमध्ये दिसला नव्हता. हे शक्य असू शकतं की, हे जर फुप्फुसांमध्ये खोलवर असेल आणि पकडल्या जाणार नाही अशा स्थानावर असेल. कारण टेस्ट मुख्यपणे वरच्या श्वसन प्रणालीला कव्हर करतो. पण याची शक्यता कमी आहे. 

तुम्ही पुन्हा पॉझिटीव्ह तर नाही ना?

टेस्टचा रिझल्ट निगेटिव्ह आला म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात असे नाही. त्यामुळे रिकव्हरीनंतर रूग्णाने कन्फर्म करण्यासाठी काही दिवासांनी किंवा 1 ते 2 आठवड्यानंतर पुन्हा टेस्ट करावी. हे त्या लोकांसाठी गरजेचं आहे जे कोरोनापासून वाचले आहेत. तसेच जे लोक हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयरोगाने पीडित आहेत त्यांना इतरांच्या तुलनेत अधिक धोका आहे.

Coronavirus : वैज्ञानिकांनी सांगितले 'ही' आहेत कोरोनाची दोन मु्ख्य लक्षणे, दिसताच लगेच डॉक्टरांना करा संपर्क!

CoronaVirus News: मिठाच्या गरम पाण्याची गुळणी कोरोना रोखणार?; वैज्ञानिकांचं संशोधन सुरू

Web Title: Coronavirus : Patients with hypertension may be likely to test again positive after recovery says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.