Positive News : कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये संसर्ग झाला; दोन्हीवेळा घरीच उपचार करून असे ठणठणीत बरे झाले डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 06:21 PM2021-05-10T18:21:16+5:302021-05-10T18:38:00+5:30

CoronaVirus Positive News : विशेष म्हणजे दोन्ही वेळेला त्यांनी होम आयसोलेशनमध्ये राहून कोरोना व्हायरसला हरवलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची सेवा करण्यास रूजू झाले.

CoronaVirus Positive News : Dr manoj kumar mishra positive in both corona waves in gorakhpur | Positive News : कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये संसर्ग झाला; दोन्हीवेळा घरीच उपचार करून असे ठणठणीत बरे झाले डॉक्टर

Positive News : कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये संसर्ग झाला; दोन्हीवेळा घरीच उपचार करून असे ठणठणीत बरे झाले डॉक्टर

Next

कोरोनाकाळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर नव्यानं संक्रमित होत असलेल्यांना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. काही लोक असेही आहेत जे रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ न देता घरच्याघरी कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन करत उपचार घेत आहेत. घरच्याघरी उपचार घेऊन बऱ्या झालेल्या एका डॉक्टरांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डॉ. मनोज कुमार कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये संक्रमित झाले. विशेष म्हणजे दोन्ही वेळेला त्यांनी होम आयसोलेशनमध्ये राहून कोरोना व्हायरसला हरवलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची सेवा करण्यास रूजू झाले.

 गोखरपूरमध्ये डॉ. मनोज रॅपिड रिस्पांस टीम (आरआरटी) चे चिकित्स अधिकारी आहेत.  त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते म्हणून त्यांना जास्त त्रास झाला नाही. गेल्या वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मनोज यांना ताप आला होता. एक-दोन दिवस तापाचे औषध घेतल्यानंतरही, जेव्हा स्थिती सुधारली नाही, तेव्हा त्याला कोविड चाचणी झाली. 31 ऑगस्ट रोजी तपासणी अहवालात संसर्ग असल्याचं दिसून आलं. शरीराच्या वेदनांव्यतिरिक्त त्यांना श्वासोच्छवासाची समस्या देखील जाणवली. ऑक्सिजनची पातळी 90 च्या वर होती आणि छातीत दुखत होते म्हणून डॉ. मनोज यांनी घरात आयसोलेशन पसंत केले. अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

15 सप्टेंबर 2020 रोजी त्यांची कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. लसीकरण सुरू होताच डॉ. मनोज यांनी  कोरोनाची लस घेतली. मार्च 2021 पर्यंत लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले. ते म्हणतात की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला. कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

झोपेवर आणि जेवणावर लक्ष दिले

डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, ''घरगुती आयसोलेशनच्या वेळी मी सकाळी संत्री, मोसंबी यांसारख्या फळांचे सेवन करायचो. दुपारी मसूर, चपाती आणि भाज्यांसह सॅलेडचे सेवन केले. दिवसातून दोन ते तीन तास चांगली झोप घेतली. सकाळी आणि संध्याकाळी योग आणि प्राणायाम केला. रात्री हळद दुधाचे सेवन केले.''

या व्यतिरिक्त, औषध वेळेवर सेवन केले गेले आणि ऑक्सिजनची पातळी नेहमीच तपासली गेली. स्वतःला कधीही कमकुवत होऊ दिले नाही. त्यांना असा विश्वास होता की त्यांनी दोन्ही लसीचे डोस घेतल्या आहेत आणि ते नक्कीच बरे होतील.  अशाप्रकारे, 22 एप्रिल रोजी त्याची चाचणी निगेटिव्ह आली. त्यांचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवालही  24 एप्रिलला निगेटिव्ह आला. 

Web Title: CoronaVirus Positive News : Dr manoj kumar mishra positive in both corona waves in gorakhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.