अनेकदा सांगूनही लोक करत आहेत 'या' चुका, व्हायरसचे शिकार होण्याआधी सावध व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 06:44 PM2020-04-23T18:44:43+5:302020-04-23T19:01:36+5:30
कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना शासनाच्या आदेशाचे पालन करत असताना वैयक्तीक स्वच्छता बाळगणं सगळ्यात महत्वाचं आहे.
चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. लोकांना वाचवण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना शासनाच्या आदेशाचे पालन करत असताना वैयक्तीक स्वच्छता बाळगणं सगळ्यात महत्वाचं आहे. वारंवार सांगूनही लोक काही चुका करत आहेत. त्यामुळे व्हायरसचं इन्फेक्शन होऊन जीवाला धोका उद्भवू शकतो. आज आम्ही तुम्हाला या सवयींबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊ शकता.
बुट-चपला धुणं
जर तुम्ही कोणत्याही कारणासाठी बाहेर जात असाल तर घरात प्रवेश केल्यानंतर गरम पाण्याने आपल्या चपला धुवायला हव्यात. कारण बाहेरून येताना चपलेसोबत व्हायरसचं इन्फेक्शन घरी आणण्याचा धोका असतो. त्यामुळे साबणाच्या पाण्यात बूडवून आपल्या चपला- बुट स्वच्छ करा.
कपडे
तुम्ही फक्त काही वेळासाठी बाहेर पडत असाल तरी, घरी आल्यानंतर आपले कपडे धुवायला टाका. तसंच रोजच्या रोज धुतलेले कपडे घाला. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या रिसर्चनुसार कोणताही व्हायरस हा कपड्यांवर दीर्घकाळ टिकून राहू शकतो. म्हणून तुमच्या कुटुंबियांना इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी कपडे स्वच्छ ठेवा.
दुधाची पिशवी धुणं
दुधाची पिशवी घरोघरी रोज आणली जाते. फॅक्टरीमधून निघाल्यानंतर तुमच्या घरी येईपर्यंत अनेकांचे हात दुधाच्या पिशवीला लागलेले असतात. त्याासाठी दुधाची पिशवी घरी आणून धुवून घ्या.
फळं भाज्या
बाहेरून फळं भाज्या आणल्यानंतर गरम पाण्याने धुवून मगच फ्रिजमध्ये ठेवा. जेवण बनवण्याच्या आधी आणि बनवून झाल्यानंतर दोन्हीवेळा हात स्वच्छ धुवा. आणलेल्या भाज्या एका भांड्यातील पाण्यात ओताव्या. पिशवी घरात न ठेवता घराबाहेर न ठेवता घराबाहेर किंवा छतावर उन्हात टाकावी. पालेभाज्या कोमट पाण्यात काही वेळ पूर्ण बुडवून ठेवाव्या व फळभाज्या, फळे १२ तास पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवाव्या.
बाहेर सामान आणायला जाताना कापडी पिशवीचा वापर करा. बाहेरून आल्यानंतर ही पिशवी सुद्धा स्वच्छ धुवून सुकवून मगच वापरा.