Coronavirus : तुम्हीही कापडाचा मास्क वापरता?... हे पाहा, तो पूर्णपणे निरुपयोगी आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 08:13 PM2021-04-30T20:13:18+5:302021-04-30T22:32:45+5:30

Coronavirus : मास्कच्या वापराबाबत मुंबई महापालिकेकडून लोकांना 'आपला मास्क विचारपूर्वक निवडा.' असा संदेश देण्यात आला आहे. 

Coronavirus : Precautions and Preventions for using mask to fight with covid 19 | Coronavirus : तुम्हीही कापडाचा मास्क वापरता?... हे पाहा, तो पूर्णपणे निरुपयोगी आहे!

Coronavirus : तुम्हीही कापडाचा मास्क वापरता?... हे पाहा, तो पूर्णपणे निरुपयोगी आहे!

Next

कोरोना माहामारीच्या काळात पोलिसांकडून वारंवार नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि लोकांकडून नियमांचे पालन करून घेण्यासाठी प्रशासनानं चांगलीच कंबर कसली आहे. कोरोनाकाळात संक्रमणापासून बचावासाठी मास्कचा शस्त्राप्रमाणे वापर केला जात आहे. आता मास्कच्या वापराबाबत मुंबई महापालिकेकडून लोकांना 'आपला मास्क विचारपूर्वक निवडा.' असा संदेश देण्यात आला आहे. 

तुम्ही  कापडाचा मास्क वापरत आहात का? असा प्रश्न या ट्विटच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. त्यानंतर जर तुम्ही कापडाचा मास्क वापरत असाल तर त्याच्या आत सर्जिकल मास्क असायला हवा. तरच व्हायरसपासून संरक्षण मिळू शकेल, असा संदेश देण्यात आला आहे.

गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी डबल मास्क लावण्यास ते जास्त सुरक्षित राहतील. यासाठीच मुंबईकरांना कॉटन मास्क लावण्याआधी सर्जिकल मास्क लावण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

CoronaVaccine : तरूणांसाठी लस घेणं कितपत सुरक्षित?; लसीकरणानंतर या गोष्टींची काळजी घ्या, तरच होईल बचाव

याशिवाय कोणता मास्क वापरल्यानं कितपत संरक्षण मिळतं हे सुद्धा  सांगितले आहे. यानुसार सर्जिकल मास्क आणि एन-९५ मास्क वारल्यानं  कोरोना व्हायरसपासून ९५ टक्के संरक्षण मिळतं. तर कापडाचा मास्क वारल्यानं ० टक्के संरक्षण मिळत असल्याचा दावा या  पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 

CoronaVaccine : संक्रमण होतंच मग कोरोनाची लस का घ्यायची? तज्ज्ञांनी सांगितला लस घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा

रुग्णसंख्येतही मोठी घट

मुंबईत २१ एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ८४ हजार ७४३ असल्याची नोंद होती. त्यात घट होऊन २४ एप्रिल रोजी हे प्रमाण ७८ हजार ७७५ वर आले. २४ एप्रिल नंतर रुग्ण निदानाच्या तुलने कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असलेली दिसून आली.

परिणामी उपचाराधीन रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसून आला. २५ एप्रिल रोजी ७५ हजार ७५०, २६ एप्रिल रोजी ७० हजार ३७३ त्यानंतर २९ एप्रिल रोजी थेट आकडा ६५ हजारांच्या खाली गेल्याची नोंद झाली. सध्या मुंबईत ६४ हजार १८ सक्रिय रुग्ण आहेत

 

Web Title: Coronavirus : Precautions and Preventions for using mask to fight with covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.