दिलासादायक! चाचणीच्या चौथ्या टप्प्यात पोहोचलं 'हे' औषध; कोरोना रुग्णांच्या उपचारात ठरतंय प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 09:59 AM2020-07-20T09:59:33+5:302020-07-20T10:09:02+5:30
रोगप्रतिकारकशक्ती सक्रिय झाल्याने टि सेल्स मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. किलर सेल्स जास्त प्रमाणात असल्यास शरीरातील व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं.
जगभरासह भारतातही कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत आहे. बायोकॉन कंपनीचे प्रमुख आणि एमडी किरण मजूमदार शॉ यांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सोरायसिसच्या आजारावरील औषधाचा वापर केला जात आहे. या औषधाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळेच या कंपनीचे अमेरिकेतील भागिदार या औषधांची चाचणी आणि परिणाम याबाबत खूप उत्साहित आहेत. सोरायसीससारख्या त्वचा रोगावरील औषधाचा कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी कसा वापर होतो. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आज आम्ही तुम्हाला या औषधाबाबत अधिक माहिती देणार आहोत.
सगळ्यात आधी हे समजून घ्यायला हवं की कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याने रुग्णांचा मृत्यू व्हायरसमुळे होत नाही तर व्हायरसचा जाळ्यात अडकल्यानंतर आपली रोगप्रतिकारक्ती ज्याप्रमाणे प्रतिसाद देईल त्याप्रमाणे व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होतो. जेव्हा कोरोना व्हायरस माणसाच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा रोगप्रतिकारकशक्ती सक्रिय झाल्याने टि सेल्स मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. किलर सेल्स जास्त प्रमाणात असल्यास शरीरातील व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं.
जेव्हा शरीरात वेगाने टी सेल्संच उत्पादन होतं तेव्हा शरीरात बदल होत असतो. त्यामुळे सुज येण्याची समस्या उद्भवते.श्वास घ्यायला त्रास होतो. शरीराला पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकत नाही त्यामुळे अचानकपणे शरीरातील अनेक अवयव निष्क्रिय होतात. टी सेल्सचं वादळ शरीरात तयार झाल्यानंतर (Cytokines Release Strom) संक्रमित सेल्स शरीरातील इतर सेल्सना नुकसान पोहोचवतात. या स्थितीला ऑटोइम्यून डिसॉर्डर असं म्हणतात. अशावेळी रुग्णांची शारीरिक स्थिती खालावते. ऑर्गन फेल्यूअरची गंभीर समस्या उद्भवू शकते किंवा मृत्यूचा सामनाही करावा लागू शकतो. अशीच स्थिती सोरायसीस आणि दमा असलेल्या रुग्णांनाही जाणवते.
कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता सोरायसीसच्या औषधावर काम करत असलेल्या तज्ज्ञांनी कोरोनाच्या लक्षणांवर प्रभावी ठरेल अशा औषधाच्या निर्मीतीसाठी अप्रुव्हल मिळाल्यानंतर पुढे काम सुरू केलं. या औषधाचे नाव टोसीलिजुमाब (Tocilizumab) आहे. या औषधाला एटिजुमॅब (Atlizumab) नावानेही ओळखले जाते. डॉक्टरांद्वारे या औषधाचा वापर केला जात आहे. हे औषध आता परिक्षणाच्या चौथ्या टप्प्यात आहे.
ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?
Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?