Coronavirus : वैज्ञानिकांचा दावा; कोरोनासोबत लढण्यासाठी सद्या टीबीची लस सर्वात प्रभावी, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 11:56 AM2020-06-13T11:56:37+5:302020-06-13T12:04:36+5:30
अजूनही कोरोनावर औषध सापडलेलं नाही. तर दुसरीकडे वैज्ञानिक दिवसरात्र वॅक्सीन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोरोना व्हायरसचं थैमान थांबायचं नाव घेत नाहीये. आतापर्यत लाखोंना या व्हायरस आपल्या जाळ्यात घेतलंय. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 8,890 पेक्षा जास्त झाली आहे. अजूनही यावर औषध सापडलेलं नाही. तर दुसरीकडे वैज्ञानिक दिवसरात्र वॅक्सीन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी अमेरिकेतील वैज्ञानिकांनी टीबीची लस आणि पोलिओची लस वापरण्याबाबत शक्यातांवर रिसर्च सुरू केलाय. 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत रिसर्च केला जात आहे की, टीबी आणि पोलिओची लस कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करू शकतो की नाही.
काय सांगतात तज्ज्ञ?
'टेक्सास ए अॅन्ड एम हेल्थ सायन्स सेंटर' मध्ये रोगप्रतिकारक शक्ती विज्ञानाचे प्राध्यापक जेफ्री ड सिरिलो यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, 'जगात ही एकमेव लस आहे जी कोरोना व्हायरससोबत निपटण्यासाठी वापरली जाऊ शकते'.
जॉन हॉप्किन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरनुसार या संक्रमणामुळे जगभरात 75,00,000 लोक संक्रमित झाले आणि 4,20,000 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेलाय. अमेरिकेत जगात सर्वाधिक 20 लाख 20 हजारपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली तर याने 1,13,000 लोकांचा जीव गेलाय.
बीसीजी लसीने मिळू शकते मदत
जगभरातील वैज्ञानिक या व्हायरसला नष्ट करणाऱ्या वॅक्सीनचा शोध घेत आहेत. डॉ. सिरिलो बीसीजी नावाने प्रचलित टीबी लसीसंबंधी परीक्षणाचं नेतृत्व करती आहेत. ते म्हणाले की, बीसीजीला खाद्य आणि औषध प्रशासनाने आधीच मंजूरी दिली आहे आणि याच्या सुरक्षित वापराचा जुना रेकॉर्ड आहे.
पोलिओ लसही महत्वाची?
रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांच्या एका ग्रुपने कोविड-19 चा प्रभाव कमी करण्यासाठी पोलिओ लसीचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवला. वैज्ञानिक म्हणाले की, कोट्यवधी लोकांनी टीबी आणि पोलिओपासून बचावाच्या लसीचा वापर केलाय आणि याने कोरोनो व्हायरससोबत लढण्यास मदत मिळू शकते.
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...
Coronavirus : काही कोरोना व्हायरस रूग्णांचं ऑक्सिजन वेगाने होतं कमी आणि मग वाढतो धोका....