पायांवरचे 'ते' डाग कोरोना संसर्गाचं लक्षण आहेत?... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 01:44 PM2020-04-17T13:44:09+5:302020-04-17T13:45:57+5:30

लहान मुलांमध्ये आणि तरूणांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. काही प्रमाणात वयोवृध्द लोकांमध्येही समस्या जाणवत आहे.  

CoronaVirus : Research covid 19 doctor suspects bruises feet may symptoms of coronavirus update myb | पायांवरचे 'ते' डाग कोरोना संसर्गाचं लक्षण आहेत?... जाणून घ्या

पायांवरचे 'ते' डाग कोरोना संसर्गाचं लक्षण आहेत?... जाणून घ्या

Next

कोरोना व्हायरसची लागण होत असलेल्यांचं प्रमाण वाढलं आहे. साधारणपणे सर्दी, खोकला, तोंडाचा कटवटपणा ही कोरोनाची लक्षणं आपल्याला माहीतच असतील. याव्यतिरिक्त कोरोनाची लक्षणं कशी असू शकतात. याबाबत संशोधकांचा रिसर्च चालू आहे. दरम्यान कोरोना रुग्णाला या लक्षणांव्यतिरिक्त पायांना कांजण्या आल्यासारखी लक्षणं दिसतात. स्पॅनिश जनरल काऊंसिल ऑफ ऑफिशियल पॉडिआट्रिस्ट कॉलेजने असे प्रकार दिसल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

कोरोनाच्या रुग्णांमध्ये कांजण्यांची लक्षण  दिसत असली तरी लहान मुलांमध्ये आणि तरूणांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. काही प्रमाणात वयोवृध्द लोकांमध्येही समस्या जाणवत आहे.  या जखमांचे डाग दीर्घकाळ तसेच दिसून येत आहेत, असं मत स्पेनच्या डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. जगभरातील इतर देशांमध्येही अशा समस्या उद्भवत असल्याचं दिसून आलं आहे.

(image credit _ daily mail)

इटलीतल्या एका हॉस्पिटलमधील प्रत्येक ५ पैकी एका कोरोना रुग्णाच्या त्वचेवर अशा जखमा दिसल्या आहेत. एलेसँड्रॉ मँजोनी हॉस्पिटलमध्ये ८८ रुग्णांवर रिसर्च करण्यात आला होता. त्वचेवर अशा जखमा रक्तवाहिन्यांना सूज आल्याने होतात, असं तज्ञांनी म्हटलं आहे.

कोरोना व्हायरस शरीराच्या फक्त एकाच भागावर नव्हे तर वेगवेगळ्या भागावर परिणाम करतो. व्हायरसमुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. कोरोना व्हायरसमुळे पायावर अशी लक्षणं दिसल्यास नवल वाटण्यासारखं काही नाही. पण फक्त अशी लक्षणं दिसली म्हणून कोरोनाचं संक्रमण झालंय असं म्हणता येणार नाही. यावर अधिक संशोधन सुरू असल्याची माहिती लंडनमधील डॉ. डॅनियल गॉर्डन यांनी डेली मेलला दिली आहे. 

सध्या स्पेनच्या एका हेल्थ सेंटरचे डॉक्टरही कोरोनाची  स्किन स्टडी करत आहेत. स्पेनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी आता ज्यांच्या पायावर अशी लक्षणं दिसून येत आहेत. अशा लोकांची तपासणी करणं सुरू केलं आहे.

Web Title: CoronaVirus : Research covid 19 doctor suspects bruises feet may symptoms of coronavirus update myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.