जीन एडिटींग टूलने कोरोनाचा होणार खात्मा; जाणून घ्या 'या' टूलने कसा नष्ट होईल विषाणू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 02:59 PM2020-06-07T14:59:03+5:302020-06-07T15:10:58+5:30
Coronavirus Latest Update : या टूलला इंफ्लूएंजा व्हायरसशी लढण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.
(image credit-science buisness)
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना विषाणूंच्या प्रसाराबाबत नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा स्थितीत स्टॅनफोर्ट युनिव्हरसिटीतील तज्ज्ञांनी दिलासादायक दावा केला आहे. स्टॅनफोर्ट युनिव्हरसिटीतील तज्ज्ञांनी असं जीन टूल तयार केलं आहे. ज्या माध्यामातून इन्फेक्टेड सेल्समधील कोरोना व्हायरस नष्ट करता येऊ शकतो. या टूलचे नाव पॅकमॅन आहे.
या टूलला इंफ्लूएंजा व्हायरसशी लढण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. या टूलचा वापर कोरोनाने संक्रमित असलेल्या रुग्णाच्या फुफ्फुसांच्या सेल्सवर करण्यात आला तेव्हा संशोधकांना ९० टक्के पॉजिटिव्ह रिजल्ट दिसून आला. या टूलला इन्फुंएंजा व्हायरसशी लढण्याासाठी तयार करण्यात आलं आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हे टूल Cas13 आणि RNA मिळून तयार करण्यात आलं आहे.
पॅकमॅन म्हणजेच या टुल्सचे नाव प्रोफेलॅक्टिक एंटीवायरल क्रिस्पर इन ह्यूमन सेल्स असं आहे. यामुळे कोरोना व्हायरसच्या जिनोम सिक्वेंसला तोडता येऊ शकतं. त्यानंतर कोरोना व्हायरसची संख्या रुग्णाच्या शरीरात वाढू शकत नाही. परिणामी कोरोना व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. सध्या याचे ट्रायल कोरोना इंफेक्टेड प्राण्यांवर केलं जाणार आहे.
कोरोनाचे तीव्र परिणाम अजूनही दिसलेले नाहीत; कम्युनिटी ट्रांसफरचा धोका अधिक
दिलासादायक! 'या' महिन्यात भारतातून नष्ट होऊ शकते कोरोनाची माहामारी, तज्ज्ञांचा दावा