कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 08:36 PM2021-02-15T20:36:37+5:302021-02-15T21:00:14+5:30

Vitamin c and zinc failed to protect from covid-19 : या दोन सप्लीमेंट्स कोरोना व्हायरसवर परिणामकारक ठरत नाहीत. इतकंच नाही या औषधांचा हाय डोससुद्धा आजारावर आपला प्रभाव दाखवण्यात निष्क्रीय ठरत आहे. 

Coronavirus Research : Vitamin c and zinc failed to protect from covid-19 says expert | कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा

कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा

Next

व्हिटामीन सी आणि झिंक कोरोना व्हायरसच्या लढाईत फायदेशीर ठरत असलेल्या दाव्याची आता पोलखोल झाली आहे. व्हिटामीन सी आणि  झिंक यांचा परिणाम पाहण्यासाठी  एक रँडमाईज क्लिनिकल चाचणी करण्यात आली होती. ज्यात असं दिसून आलं की, या दोन सप्लीमेंट्स कोरोना व्हायरसवर परिणामकारक ठरत नाहीत. इतकंच नाही या औषधांचा हाय डोससुद्धा आजारावर आपला प्रभाव दाखवण्यात निष्क्रीय ठरत आहे. 

व्हायरल कोल्ड आणि फ्लूपासून आराम मिळवण्यासाठी पारंपारिक स्वरूपात  वापरात असलेल्या व्हिटामीन सी आणि झिंकवर झालेले हे संशोधन जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. या अभ्यासातून दावा करण्यात आला आहे की, घरात या सप्लिमेंट्सचा उपयोग करत असलेल्या कोविड १९ च्या रुग्णांवर काहीही फायदा झालेला नाही. 

विटामिन-सी और जिंक बेअसर 5

या अभ्यासातून बाहेर आलेले निकष कमकुवत असल्यामुळे हा अभ्यास त्वरित थांबवण्यात आला.  जॉन हॉपकिन्सच्या डॉ, एरिन मिचोस आणि हाऊस्टन मेथोडिस्ट यांच्या डॉ. मिनिल कॅन्जोस यांनी सांगितले की, ''या दोन्ही सप्लीमेंट्स आपला प्रभाव  दाखवण्यासाठी अयशस्वी ठरल्या आहेत.''

कशी झाली चाचणी

या चाचणीसाठी जवळपास २१४ लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं, जे घरातूनच कोरोनातून रिकव्हर झाले होते.   याच चार वेगवेगळे गट होते. त्यातील पहिल्या गटाला व्हिटामीन सी चा हाय डोस देण्यात आला होता. तर दुसऱ्या गटाला  झिंकचा डोस देण्यात आला होता. तिसऱ्या गटाला दोन्ही सप्लिमेंट्चे कॉम्बिनेशन देण्यात आले होते. चौथ्या गटाला निरिक्षणाअंतर्गत ठेवण्यात आलं होतं. 

क्वीवलँडचे क्लिनिक कार्डीओलॉजिस्ट डॉ. मिलिंद देसाई आणि त्यांच्या टीमला झिंक आणि ग्लूकोटेन, एस्काॉर्बिक एसिडच्या  हाय डोसचा कोणताही परिणाम रुग्णावर दिसून आला नाही.  याऊलट  हाय डोसमुळे अनेक रुग्णांमध्ये साईट इफेक्ट्स दिसून आले. अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा

व्हिटामीन सी एक एंटी ऑक्सिडेंटस आहेत. जे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत बनवण्यासाठी कार्य करतात. काही अभ्यासानुार कोल्डच्या समस्येत व्हिटामीन सी लहान मुलांमध्ये १४ टक्के आणि तरूणांमध्ये ८ टक्के परिणामकारक ठरते. तसंच झिंक शरीराला इंफेक्शपासून वाचवण्यासाठी  शक्ती देतो. रिसर्चनुसार शरीरात झिंकच्या कमतरतेमुळे  प्रो इंफ्लेमेटरी सायटोकाईन्स वाढण्याचा धोका असतो. चिंता वाढली! मास्कमुळे उद्धवताहेत डोळ्यांच्या समस्या?, वेळीच व्हा सावध; अशी घ्या काळजी
 

Web Title: Coronavirus Research : Vitamin c and zinc failed to protect from covid-19 says expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.