एकत्र बसून खाणंपिणं पडलं महागात; ९५ लोकांना कोरोनाची लागण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 03:21 PM2020-06-30T15:21:00+5:302020-06-30T15:31:37+5:30
CoronaVirus News : एकूण १०७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रुग्णांच्या संख्येत अजुनही वाढ होत आहे.
कोरोनाच्या माहामारीचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या भारतात पाच लाखांपेक्षा जास्त आहे. जगभरातील मृतांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेले ९५ लोक कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे हे लोक एकत्रितपणे पबमध्ये भेटले होते. त्यामुळे त्यांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे.
पबमध्ये गेलेल्या लोकांच्या संपर्कात असलेले अन्य १२ लोकसुद्धा कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत अमेरिकेतील मिशिगनच्या हार्पर रेस्टॉरंट आणि ब्रू पब च्या संपर्कात असलेल्या एकूण १०७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रुग्णांच्या संख्येत अजुनही वाढ होत आहे.
सोशल मीडियावर असलेल्या फोटोतून दिसून आले की लॉकडाऊननंतर सगळ्यात आधी पब उघल्यानंतर लोकांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोनाची लागण झालेली दिसून आली आहे. आता अनिश्चित काळासाठी हा पब बंद करण्यात आला आहे.
nytimes.com च्या रिपोर्टनुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेले सगळे लोक १२ ते २० जूनच्या दरम्यान पबमध्ये गेले होते. कोरोनाबाधित व्यक्ती १५ ते २८ या वयोगटातील आहेत. या लोकांमध्ये सुरूवातीला सौम्य लक्षणं दिसून आली होती. स्थानिक आरोग्य प्रशासनाने १२ ते २० जून या दरम्यान पबमध्ये गेलेल्या लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे.
याआधी अमेरिकेत मिशिगनमध्ये रेस्टॉरंट आणि पब काही अटींवर खोलण्यासाठी परवागनी देण्यात आली होती. ५० टक्के लोकांना फक्त परवागनी दिला जावी अशा सुचना देण्यात आल्या होत्या. परंतू यापेक्षा जास्त लोक नियमांचे पालन न करता मास्कशिवाय तिथे पोहोचले त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने झाला.
कोरोना काळातही ऑफिसला जावंच लागत असेल; तर कोरोना संसर्गापासून 'असा' करा बचाव
व्हिटामीन 'D' ने कोरोना विषाणूंपासून बचाव होतो? तज्ज्ञांनी दिली नवीन माहिती