CoronaVirus : कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 11:21 AM2020-09-14T11:21:05+5:302020-09-14T11:35:20+5:30

अनेक देशांकडून  स्पुतनिक व्ही या लसीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा राष्ट्रपतींकडून सांगण्यात आले.

CoronaVirus : Russia ship 50 million coronavirus vaccine sputnik v doses brazil tsta | CoronaVirus : कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार 

CoronaVirus : कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार 

Next

जगभरात कोरोना व्हायरसच्या माहामारीनं हाहाकार निर्माण केला आहे. कोरोना विषाणूंची लस तयार करण्याासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या लसीच्या शर्यंतीत सुरूवातीपासून रशियन लस पुढे होती. दरम्यान रशियाच्या लसीबाबत  एक मोठी माहिती समोर येत आहे. रशियानं ब्राझिलला लसीचे ५ कोटी डोज पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. rt.com मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडानं सांगितले की नोव्हेंबरमध्ये स्पुतनीक व्ही  या लसीचे वितरण सुरू होणार आहे. ब्राझिलकडून आता अंतिम मंजूरी येणं बाकी आहे. 

कोरोना व्हायरसनं सगळ्यात जास्त प्रभावी असलेल्या देशांपैकी एक ब्राझिल आहे. ब्राझिलमध्ये कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 4,315,858 पेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी 131,274 लोकांचा मृत्यू झाला आहे.  जास्त मृतांच्या संख्येत अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण संक्रमित रुग्णसंख्येमध्ये अमेरिका आणि भारतानंतर ब्राझिलचा क्रमांक येतो. रशियानं कोरोना लसीच्या कोट्यावधी डोजसाठी ब्राझिलमधील अनेक राज्यांशी करार केला आहे.

आता राष्ट्रीय स्तरावर ब्राझिल रशियाशी करार करेल अशी आशा अनेकांना आहे. अनेक देशांकडून  स्पुतनिक व्ही या लसीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा राष्ट्रपतींकडून सांगण्यात आले.  रशियानं दिलेल्या माहितीनुसा लस तयार करण्यासाठी आतापर्यंत आधारभूत संरचना पहिल्यापासूनच तयार होती. त्यामुळे कमी वेळात लस तयार करणं शक्य झालं.  RDIF नं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस लॉन्च केल्यापासून वेगवेगळ्या देशातून मागणीला सुरूवात झाली आहे. वेगवेगळ्या देशांतून आतापर्यंत अरबो डोसची ऑर्डर मिळाली आहे. 

भारतात कोरोना विषाणूने केले रूपांतर, समोर आली अजून वेगळी लक्षणे

सर्वसाधारणपणे डेंग्यूच्या आजारामध्ये ताप आल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. मात्र आता हे लक्षण कोरोनाच्या रुग्णांमध्येही दिसू लागले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या प्लेटलेट्स अचानक घटून २० हजारांहून कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र संबंधित रुग्णाची डेंग्यूची चाचणी केल्यास त्यामध्ये संबंधित रुग्णास डेंग्यू नसल्याचे समोर येत आहे. तसेच असे रुग्ण हे आजार गंभीर अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतर सापडत आहेत.

याबाबत पीजीआयचे प्राध्यापक अनुपम वर्मा यांनी सांगितले की, रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये अचानक मोठी घट होत असल्याने अशा रुग्णाची प्रकृती स्थिर राखणे कठीण होत आहे. पीजीआयमध्ये दाखल झालेल्या लोकबंधू रुग्णालयामधील एका डॉक्टरच्या प्लेटलेट्स भरती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दहा हजारांवर पोहोचल्या होत्या.

कोरोना विषाणू रुग्णांचा इम्युन कॉम्प्लेक्स बिघडवत आहे. त्यामध्ये मोनोसाइड आणि मॅकरोफेज सेलवर हल्ला होत आहे. यामध्ये शरीरातील प्लेटलेट्सची गरज वाढत आहे. मात्र त्याची शरीरामधील निर्मिती आधीपेक्षा कमी होते. त्यामुळेच प्लेटलेट्स काऊंट अचानकपणे कमी होत आहे. अशा रुग्णांची प्रकृती बहुतकरून गंभीर असते. त्यांना प्लेटलेट्स दिल्या जातात. तसेच गरज पडल्यास प्लाझ्मा थेरेपीसुद्धा दिली जाते.

या सर्वामुळे आताच्या परिस्थितीमध्ये कोरोना रुग्णांची डेंग्यूची तपासणी करणे आवश्यक बनले आहे. विशेषकरून ज्या रुग्णांच्या प्लेटलेट्स काऊंटमध्ये घट होत आहे, अशांची चाचण होणे अधिक आवश्यक आहे. त्यामधून संबंधित रुग्णाला डेंग्यू आहे की कोरोना निश्चित होऊ शकेल. तसेच याबाबत अधिक शोध सुरू आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले. 

 

हे पण वाचा-

काळजी वाढली! २०२१ च्या अखेरपर्यंत आहे तशीच राहणार परिस्थिती; प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञांचा दावा

कच्चा कांदा खाण्याचे 'हे' फायदे वाचाल; तर जेवताना रोजच आवडीनं कांदा  खाल

Web Title: CoronaVirus : Russia ship 50 million coronavirus vaccine sputnik v doses brazil tsta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.