लक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत

By manali.bagul | Published: September 30, 2020 07:42 PM2020-09-30T19:42:50+5:302020-09-30T19:46:51+5:30

या चाचणीला RT-LAMP म्हणतात. ज्यांना लक्षणं दिसतात तेच लोक चाचणी करतात. पण ही चाचणी सोपी असल्यामुळे लक्षणं नसलेले लोकही आरामात चाचणी करू शकतात.

CoronaVirus : Saliva covid-19 tests to detect asymptomatic corona patient | लक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत

लक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत

Next

कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात अजूनही वेगानं होत आहे. कोरोनाची तपासणी करण्यासाठी सध्या आरटीपीसीआर  चाचणी केली जात आहे.  ही चाचणी करण्याासाठी नाक आणि घश्यातील स्वॅब  घेतले जातात. या नमुन्याद्वारे कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे पाहिलं जातं. अनेकदा टेस्ट करणं खूप खर्चीक ठरतं.  रिपोर्ट  हातात मिळण्यासाठी  उशिर होऊ शकतो. या चाचण्याव्यतिरिक्त एक सोपी चाचणी करून तुम्ही कोरोनाची  तपासणी करू शकता. या  चाचणीला RT-LAMP म्हणतात. साधारणपणे ज्यांना लक्षणं दिसतात तेच लोक चाचणी करतात. पण ही चाचणी सोपी असल्यामुळे लक्षणं नसलेले लोकही आरामात चाचणी करू शकतात.  यासंबंधी वृत्त हिंदूस्थान टाईम्सनं दिले आहे. 

जपानमधील होक्कायदो विद्यापीठातील संशोधकांनी RT-LAMP चाचणीची परिणामकता तपासून पाहिली. Clinical Infectious Diseases जर्नलमध्ये  हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोरोनाची लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांसाठी ही टेस्ट उपयुक्त असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. या चाचणीसाठी संशोधकांनी जवळपास  २ हजार लोकांच्या नाक आणि तोंडातील स्वॅबचे नमुने घेतले होते.

अनेकांच्या दोन्ही चाचण्या सारख्याच आल्या होत्या. नाकातील स्वॅब नमुन्यातून इन्फेक्शनचं  ७७ ते ९३ टक्के  इन्फेक्शनचं निदान झालं होतं तर लाळेच्या नमुन्यातून ८३ ते ९७ टक्के इन्फेक्शन झालं होतं. याशिवाय कोरोनाचं संक्रमण झालं आहे की नाही  हे ओळखण्यासाठी दोन्ही चाचण्यांची ९९.९  टक्केवारी  होती. 

तज्ज्ञ तेशिमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''लाळेची चाचणी  सोपी असून फायदेशीर ठरते. रुग्णांना त्रासाचा सामना या चाचणीमुळे करावा लागत नाही. साधारणपणे nasopharyngeal swab testing  लोकांना नाकाचे आणि तोंडातील स्वॅब दयावे लागतात. स्वॅब घेत असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून संक्रमणाचा धोका असतो. तुलनेने लाळेचे नमुने देणं सोप असल्याने ही चाचणी सोयीस्कर ठरते. ''

पुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना

टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्तर कमी असल्यास मृत्यूचा धोका जास्त असतो. पण नवीन संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर बिघडू शकतो. या स्थितीमुळे पुरूषांना रोगातून बाहेर येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.  रिसर्च जर्नल 'द एजिंग मेल' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका शोधानुसार जसजसं पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होतो. तसतसं आयसीयूमध्ये भरती होण्याची शक्यता  जास्त  असते. 

संयुक्त अरब अमीरातच्या मेर्सिन विद्यापीठातील युरोलॉजीचे प्राध्यापक आणि प्रमख संशोधन सेलाहिटिन सियान यांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरात टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी असल्यास कोरोनाचा धोका जास्त असतो. पण हा पहिलाच असा अभ्यास आहे. ज्यातून कोरोना संक्रमणामुळे पुरूषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होत असल्याचे दिसून आले आहे. 

टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी झाल्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे जोखिम वाढते. म्हणून कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर येण्यास वेळ लागू शकतो. कोणत्याही संक्रमणापासून बचाव करण्यासाठी तसंच रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी टेस्टोस्टेरॉनची भूमिका महत्वाची असते. या हार्मोनला सेक्स हार्मोन असंही म्हटलं जातं. टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन आजारांशी लढण्यासाठी एंटीबॉडी तयार करण्यासाठी महत्वाचा मानला जातो.

Web Title: CoronaVirus : Saliva covid-19 tests to detect asymptomatic corona patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.