युद्ध जिंकणार! शरीरात कोरोना विषाणूंची वाढ होण्यापासून रोखणार 'हे' नवीन औषध, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 04:28 PM2020-08-16T16:28:33+5:302020-08-16T16:48:33+5:30

या औषधाचा वापर हियरिंग डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर म्हणजेच ऐकण्याची क्षमता सुधारण्यासाठी  केला जात होता. 

Coronavirus: scientists claims pre existing drug ebselen may help prevent covid-19 | युद्ध जिंकणार! शरीरात कोरोना विषाणूंची वाढ होण्यापासून रोखणार 'हे' नवीन औषध, तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! शरीरात कोरोना विषाणूंची वाढ होण्यापासून रोखणार 'हे' नवीन औषध, तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसच्या माहामारीनं संपूर्ण देशात हाहाकार निर्माण केला आहे. संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे.  दरम्यान कोरोनाच्या माहामारीत सकारात्मक माहिती समोर येत आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार शरीरातील कोरोना विषाणूंची वाढ  रोखण्यासाठी आधीपासून एका आजारात वापरात असलेलं औषध परिणामकारक ठरत आहे.

या औषधाचा वापर हियरिंग डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर म्हणजेच  ऐकण्याची क्षमता सुधारण्यासाठी  केला जात होता.  पण हे औषध कोरोनावर कसं प्रभावी ठरतं याबाबत आम्ही सांगणार आहोत. या औषधाचं नाव एब्सेलेन आहे. अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधानं शरीरात कोरोना विषाणूंची संख्या वाढवत असलेल्या एंजाइम्सना नियंत्रणात आणता येऊ शकतं.

हा शोध जर्नल साइंस एडवांसेजमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार एम्प्रो एंजाइम कोरोना वायरसचे जेनेटिक मटेरियल (आरएनए) प्रोटीन्स  तयार करण्याची क्षमता प्रधान करतात. त्यामुळे व्हायरस संक्रमित रुग्णांच्या शरीरात आपली संख्या वाढवते.  या एन्जाईंम्सना कंट्रोल केल्याने व्हायरसचा प्रसार रोखता येऊ शकतो. संशोधनादरम्यान एम्पो एंजाइम्सविरुद्ध लढत असलेल्या या औषधाचं नाव एब्सेलेन आहे. हे एकाप्रकारचे रासायनिक यौगिक (केमिकल कंपाउंड) आहे.

प्रतीकात्मक तस्वीर

ज्यात एंटी व्हायरल, एंटी इंफ्लामेट्री,  एंटी ऑक्सीडेटिव, बॅक्ट्रीसिडल आणि सेल प्रोटेक्टिव गुण आहेत. संशोधकांच्या टीमनं एंजाइम्स आणि एब्सेलेन औषधाचं विस्तृत मॉडेल तयार केलं आहे. सुपर कंप्यूटर सिम्युलेशनमध्ये दिसून आलं की एब्सेलेन एम्प्रो एंजाईम्सची सक्रिया कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एब्सेलेन माणसांसाठी सुरक्षित असून क्लिनिकल ट्रायलदरम्यान सकरात्मक परिणाम दिसून आले आहेत. सध्या संशोधक ज्या प्रोटीन्समुळे कोरोना विषाणूंची संख्या वाढून रुग्णांची स्थिती गंभीर होते. अशा प्रोटीन्सचा शोध घेत आहेत. 

दरम्यान तज्ज्ञांकडून एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. अमेरिकन तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार नॅनोबॉडीजयुक्त एंटी कोरोना स्प्रे तयार केला आहे. या स्प्रेचा वापर इनहेलरप्रमाणे करता येऊ शकतो. या स्प्रेचा वापर केल्यानंतर नॅनोबॉडीजमार्फत कोरोनाचे संक्रमण पसरवत असलेल्या व्हायरसला शरीरात पोहोचण्यापासून रोखता येऊ शकतं. यामुळे व्हायरस घश्यापर्यंत पोहोचूनही  शरीरात प्रवेश करू शकणार नाही. या नेजल स्प्रे च्या वापरानं कोरोना व्हायरसच्या प्रोटीन्सना ब्लॉक करता येऊ शकतं.  कोरोना व्हायरस प्रोटीन्सना ब्लॉक करत असलेला हा नेजल स्प्रे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी तयार केला आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या इनहेलर स्प्रे तयार करण्यासाठी एंटीबॉडीजचा वापर करण्यात आला आहे. सगळ्यात आधी एंटीबॉडीजद्वारे नॅनोबॉडीजची निर्मीती करण्यात आली. प्रयोगशाळेत या नॅनोबॉडीज जेनेटीकली विकसित करण्यात आल्या आहेत. संशोधकांच्या टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा एंटीबॉडी स्प्रे तयार करण्यासाठी नॅनोबॉडीजचा वापर महत्वपूर्ण ठरला होता

हे पण वाचा-

कोरोनासह 'या' ५ आजारांपासून लांब ठेवेल ओव्याचा काढा; 'असा' तयार करा 

WHO नं अविश्वास दाखवल्यानंतरही रशियाच्या लसीवर 'या' देशांचा विश्वास; लवकरच लस विकत घेणार

यशस्वी लसीच्या दाव्यावरून WHO नं केली रशियाची पोलखोल; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

भारतातही रशियाची कोरोनावरील लस तयार होण्याची शक्यता, अनेक कंपन्यांचा पुढाकार

Web Title: Coronavirus: scientists claims pre existing drug ebselen may help prevent covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.