CoronaVirus News: स्वत:ला प्रश्न विचारून द्या गुण; तुमची मनस्थिती घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:04 AM2020-06-16T03:04:12+5:302020-06-16T06:44:46+5:30
प्रत्येकाला स्वत:ची मानसिक चाचणी करून नैराश्याचे निदान करता यायला हवे.
Next
- डॉ. अमोल अन्नदाते, (लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या काही महिन्यांपासून सर्वच व्यावसायिक क्षेत्र अनिश्चिततेचा सामना करत आहेत. त्यामुळे साहजिकच नैराश्येचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच प्रत्येकाला स्वत:ची मानसिक चाचणी करून नैराश्याचे निदान करता यायला हवे. गरज भासल्यास यासाठी पुढील प्रश्नावली वापरता येईल...
समस्या | कधीही नाही | बरेच दिवस | महिन्यातून अर्धे दिवस | जवळपास प्रत्येक दिवस |
१. कुठल्याही कामात / गोष्टीत फार रस न वाटणे किंवा आनंद न मिळणे | ० | १ | २ | ३ |
२. निराश वाटणे / उदास वाटणे | ० | १ | २ | ३ |
३. झोप लागण्यास वेळ लागणे / सतत झोपमोड होणे / खूप जास्त झोप येणे / सतत झोपावे वाटणे. | ० | १ | २ | ३ |
४. थकलेले वाटणे / शरीरात उर्जा नसल्या सारखे वाटणे. | ० | १ | २ | ३ |
५. भूक नाहीशी होणे/ खूप खाणे. | ० | १ | २ | ३ |
६. ६. स्वत:बद्दल नकारात्मक भावना मनात येणे / वाईट वाटणे / अपयशी असल्यासारखे वाटणे / कुटुंबाला आपल्यामुळे नुकसान / हिरमोड झाला असे वाटणे | ० | १ | २ | ३ |
७. कामावर लक्ष केंद्रित न होणे / पेपर वाचणे / टीव्ही बघण्यासारख्या नेहमीच्या गोष्टी करतानाही लक्ष न लागणे | ० | १ | २ | ३ |
८. इतके हळू बोलणे की इतरांना नीट ऐकू येत नाही किंवा खूप मोठ्याने बोलणे / सतत इकडून तिकडे चकरा मारणे / नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ असणे | ० | १ | २ | ३ |
९. आपण नसलेलो / मेलेलोच बरे असे विचार मनात येणे / स्वत:ला इजा करणे / स्वत:ला इजा करण्याची इच्छा होणे | ० | १ | २ | ३ |
नैराश्याची अवस्था प्रारंभीची असली, तरी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.