Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 03:43 PM2020-07-18T15:43:56+5:302020-07-18T15:49:45+5:30
किंग्स कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांना त्याच्या रिसर्चमध्ये आढळलं की, कोरोना व्हायरसच्या तुलनेत सहा प्रकारच्या केसमध्ये याचा धोका १० पटीने अधिक असतो की, रूग्णाला श्वास घेण्यास मदतीची गरज पडेल.
वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या लक्षणांच्या आधारावर या कोरोना व्हायरस आजारांबाब माहिती मिळवली आहे. या सर्वच सहा कोरोना व्हायरस केसेसमध्ये डोकेदुखी आणि गंधाची क्षमता कमी होणे ही दोन लक्षणे दिसली. वैज्ञानिकांनी आर्टिफिशिल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेकडो केसेसचं विश्लेषण केलं. किंग्स कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांना त्यांच्या रिसर्चमध्ये आढळलं की, कोरोना व्हायरसच्या तुलनेत सहाव्या प्रकारच्या कोरोना व्हायरस केसेसमध्ये याचा धोका १० पटीने अधिक असतो की, रूग्णाला श्वास घेण्यास मदतीची गरज पडेल.
वैज्ञानिकांच्या नव्या रिसर्चनंतर कोरोना व्हायरसच्या केसमध्ये सर्वाधिक धोका असणाऱ्या रूग्णांची वेळेआधीच ओळख पटवणं शक्य होईल. रिसर्चसाठी वैज्ञानिकांनी अमेरिका आणि ब्रिटनच्या १६००० कोरोना संक्रमित रूग्णांच्या डेटाचं विश्लेषण केलं. किंग्स कॉलेज लंडनचे क्लेअर स्टीव्स म्हणाले की, जर आजार झाल्यावर पाचव्या दिवशी आपल्याला समजलं की, रूग्ण कोरोना व्हायरस आजाराच्या कोणत्या कॅटेगरीत आहे. तर वेळेवर त्याच्यावर योग्य ते उपचार करता येतील.
रिसर्चमधून समोर आलं की, सर्वात कमी घातक व्हायरसने आजारी झाल्यावर फ्लू सारखी लक्षणे दिसतात आणि सोबतच तापही येऊ शकतो किंवा येणारही नाही. तेच तिसऱ्या प्रकारच्या कोरोना व्हायरस केसेमध्ये डायरियाची लक्षणे असू शकतात. तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या प्रकारच्या कोरोना व्हायरसच्या केसमध्ये थकवा, कन्फ्यूजन, श्वास घेण्यास अडचणसारखी लक्षणे सर्वाधिक असू शकतात.
रिसर्चमधून हेही समोर आले की, पहिल्या प्रकारच्या कोरोना व्हायरसने आजारी १.५ टक्क रूग्ण, दुसऱ्या प्रकारच्या केसमध्ये ४.४ टक्के रूग्ण, तिसऱ्या प्रकारातील केवळ ३.३ टक्के रूग्णांना श्वास घेण्यास मदत घेण्याची गरज पडू शकते. तसेच चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या प्रकारच्या केसमध्ये ही आकडेवारी क्रमश: ८.६ टक्के, ९.९ टक्के आणि १९.८ टक्के बघण्यात आली.
सहाव्या प्रकारच्या कोरोना व्हायरस केसेसमध्ये आढळून आलं की, अर्ध्या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज पडली. तर पहिल्या प्रकारच्या कोरोनाच्या केसेसमध्ये केवळ १६ टक्के रूग्णांवरच हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली.
CoronaVirus : टेन्शन वाढलं! कोरोनावरच्या 'त्या' औषधांनी मोठा धोका; WHOचा गंभीर इशारा