'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:15 PM2020-07-29T16:15:36+5:302020-07-29T16:23:01+5:30

CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेने हवेतून होत असलेल्या कोरोना प्रसाराबाबत माहिती दिल्यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने धुम्रपान करत असलेल्या लोकांना सुचना दिली आहे.

CoronaVirus : Smokers are likely to be more vulnerable to covid19 say union health ministry | 'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती

'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती

Next

कोरोना विषाणूंचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाच्या लसीवर संशोधन करत आहेत. कोरोना व्हायरसच्य वाढत्या संक्रमणाबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हवेतून होत असलेल्या कोरोना प्रसाराबाबत माहिती दिल्यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने धुम्रपान करत असलेल्या लोकांना सुचना दिली आहे. आतापर्यंत धुम्रपान केल्यामुळे कॅन्सर आणि फुफ्फुसांचे आजार होत असल्यामुळे धुम्रपान करण्यास मनाई केली जात होती.

आता आरोग्य मंत्रालयाने धुम्रपान करणारे लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार धुम्रपान करत असलेल्या लोकांमध्ये कोरोनामुळे संक्रमण होण्याची शक्यता असते. कारण स्मोकिंग केल्याने हाताद्वारे व्हायरस तोंडापर्यंत पोहोचू शकतो. दरम्यान ३२ देशातील १५० पेक्षा जास्त तज्ज्ञांनी दावा केला आहे. की, हवेद्वारे कोरोना विषाणूंचे संक्रमण पसरू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूंचे संक्रमण हवेतून  पसरण्याचा धोका जास्त असतो.

हवेत कोरोना किती दूरपर्यंत पसरू शकतो. याबाबत तज्ज्ञांना कोणताही ठोस पुरावा सापडलेले नाही. पण एखादया व्यक्तीच्या शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर लाळेतून निघत असलेल्या ड्रॉपलेट्समधून कोरोना विषाणूंचे संक्रमण हवेत पसरू शकतं. १ मीटर ते ६ मीटरपर्यंत हे संक्रमण पसरू शकतं.  याबाबत डॉक्टरांनी सहमती दर्शवलेली नाही. रुग्णालयात, स्वतःच्या खोलीत किंवा रस्त्यावर, संक्रमित व्यक्ती कोणत्या ठिकाणी असते त्यावरून संक्रमण पसरण्याची स्थिती अवलंबून असते. शक्यतो मोकळ्या जागी संक्रमण पसरण्याचा धोका कमी असतो. 

त्यासाठी घरातून बाहेर निघताना मास्क लावणं गरजेचं आहे. तसंच कारण नसताना घराच्या बाहेर पडू नये. बाहेर निघाल्यानंतर सोशल डिस्टेंसिंगचं पालन करायला हवं. कारण जर कोरोनाचा प्रसार हवेतून होत असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं धोक्याचं ठरू शकते.  हवेतून होत असेलल्या संसर्गापासून लांब राहण्यासाठी कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी जाणं टाळा, एसीचा वापर करू नका. घरी कोरोना रुग्ण असल्यास बाथरूम आणि कोरोना रुग्णांची खोली स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. 

CoronaVirus News : अमेरिकन कंपनीची कोरोनाची लस खिशाला कात्री लावणार; जाणून घ्या किंमत

युद्ध जिंकणार! कोरोनाशी लढण्यासाठी १ नाही तर २ लसींसह सज्ज आहेत 'हे' देश, जाणून घ्या कोणते

Web Title: CoronaVirus : Smokers are likely to be more vulnerable to covid19 say union health ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.