Coronavirus : साबण की सॅनिटायजर, कोरोनापासून बचावासाठी काय जास्त फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 09:57 AM2020-03-19T09:57:23+5:302020-03-19T09:57:47+5:30

Coronavirus : हा जीवघेणा व्हायरस पसरल्यानंतर लोकांना सुरक्षा म्हणून सतत साबण आणि सॅनिटायजरने हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे.

Coronavirus : Soap or sanitizer which is the best thing to avoid virus? api | Coronavirus : साबण की सॅनिटायजर, कोरोनापासून बचावासाठी काय जास्त फायदेशीर?

Coronavirus : साबण की सॅनिटायजर, कोरोनापासून बचावासाठी काय जास्त फायदेशीर?

Next

चीनच्या वुहान शहरातून आलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतासह 100 पेक्षा जास्त देशांना आपला शिकार बनवलं आहे. हा जीवघेणा व्हायरस पसरल्यानंतर लोकांना सुरक्षा म्हणून सतत साबण आणि सॅनिटायजरने हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे. पण अशात अनेकांनी असाही प्रश्न पडतोय की, या व्हायरससोबत लढण्यासाठी साबण जास्त फायदेशीर आहे की, सॅनिटायजर.

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ वेल्सचे प्राध्यापक पॉल थॉर्डर्सन यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी साबण जास्त फायदेशीर आहे. साबण व्हायरसमध्ये असलेल्या लिपिडचा सहजपणे खात्मा करू शकतं. साबणात फॅटी अ‍ॅसिड आणि सॉल्टसारखे तत्व असतात. ज्याना एम्पिफाइल्स म्हटलं जातं. साबणातील हेच गुण व्हायरसच्या बाहेरील थराला निष्क्रिय करतात.

साधारण 20 सेकंदापर्यंत साबणाने चांगले हात धुतले तर व्हायरसला एकत्र जोडून ठेण्यासाठी मदत करणारा चिकट पदार्थ नष्ट होतो. तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की, साबणाने हात धुतल्यावर त्वचा थोडी ड्राय होते आणि हातावर थोड्या सुरकुत्याही पडतात. मुळात असं होण्याचं कारण म्हणजे साबण खोलात जाऊन कीटाणूंचा नायनाट करतं. 

आता सॅनिटायजर साबणा इतकं प्रभावशाली का नाही हे जाणून घेऊ. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चनुसार, जेल, लिक्विड किंवा क्रीमच्या रूपात असलेलं सॅनिटायजर कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी साबणा इतकं चांगलं नाही. कोरोना व्हायरसचा सामना केवळ तेच सॅनिटायजर करू शकतं ज्यात अल्कोहोलचं प्रमाण अधिक असेल. त्यामुळे साबण हा हात धुण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी बेस्ट पर्याय आहे.

हात कधी धुवावेत?

जेवण बनवताना, जेवताना आणि जेवण वाढताना आणि यापूर्वी हात धुऊन घ्यावेत

शौचास जाऊन आल्यानंतर हात धुणे आवश्यक

शिंकल्यानंतर हात धुवावेत

आपल्या बाळाचे नाक स्वच्छ केल्यानंतर हात धुणे गरजेचे

शौचास गेल्यानंतर किंवा डायपर बदलल्यानंतर

पाळीव प्राण्यांसोबत खेळल्यानंतर हात जरूर धुवावेत

आजारी व्यक्तीच्या भेटीनंतर

असे धुवा हात, रोगांवर करा मात

सुरुवातीला हात स्वच्छ आणि कोमट पाण्याने ओले करा. यानंतर साबण लावून हात २० सेकंदांपर्यंत व्यवस्थित एकमेकांवर चोळा. या प्रक्रियेत हातांसहित तळवे, हाताचा मागील भाग, बोटे आणि नखेदेखील स्वच्छ झाली पाहिजेत. यानंतर हात पाण्याने स्वच्छ करा, एका कापडाने हात पुसून घ्यावा. हात पुसण्यासाठी स्वत:च्याच रुमाल किंवा टॉवेलचा वापर करावा.


Web Title: Coronavirus : Soap or sanitizer which is the best thing to avoid virus? api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.