Coronavirus : ना 14 ना 15, 'इतके' दिवस शरीरात राहू शकतं कोरोना व्हायरसचं संक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:11 PM2020-07-02T13:11:31+5:302020-07-02T13:11:46+5:30

आरोग्य मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमधून समोर आलं होतं की, भारतात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांमध्ये 69 टक्के रूग्णांमध्ये लक्षणेच दिसली नाहीत.

Coronavirus : Special Task force member warns that coronavirus complete his cycle in 28 days not in 14 | Coronavirus : ना 14 ना 15, 'इतके' दिवस शरीरात राहू शकतं कोरोना व्हायरसचं संक्रमण

Coronavirus : ना 14 ना 15, 'इतके' दिवस शरीरात राहू शकतं कोरोना व्हायरसचं संक्रमण

Next

कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि त्याच्या उपचाराच्या प्रक्रियांबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत राहतात. इतकंच नाही तर कोरोना व्हायरसची नवनवीन लक्षणेही समोर येत आहेत. सुरूवातीला असं सांगण्यात आलं होतं की, कोरोना व्हायरसच्या प्रमुख लक्षणांमध्ये सर्दी, ताप आणि खोकला आहे. इतकेच नाही तर आरोग्य मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमधून समोर आलं होतं की, भारतात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांमध्ये 69 टक्के रूग्णांमध्ये लक्षणेच दिसली नाहीत. दरम्यान कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या एका सक्रिय सदस्यांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसचं संक्रमण 14 दिवस नाही तर त्यापेक्षा जास्त दिवस शरीरात राहू शकतं.

नवभारत टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, कोविड-19 सोबत लढण्यासाठी भारतातील सर्वच राज्यांमध्ये विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. जेणेकरून कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांवरील उपचार आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळेसोबतच वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवता यावं. अशाच एका टास्क फोर्स भाग राहिलेल्या सदस्याने याबाबत माहिती दिली की, कोरोना व्हायरस संक्रमणाला आपली सायकल पूर्ण करण्यासाठी 14 दिवसांचा काळ फार कमी आहे.

त्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसने संक्रमित काही रूग्ण असेही आढळले ज्यांच्यात 14 दिवसांपेक्षा अधिक काळ कोरोनाची लक्षणे कायम होती. ते म्हणाले की, सुरूवातीला असं मानलं गेलं की, 14 दिवसांच्या सायकलनंतर कोरोनाग्रस्त रूग्ण पूर्णपणे बरा झालेला असेल, पण कोरोना व्हायरसला त्याची सायकल पूर्ण करण्यासाठी जवळपास 28 दिवसांचा वेळ लागतो. 

COVID-19 टास्क फोर्सच्या सदस्याने असाही दावा केला की, 14 दिवसांनंतर रूग्णात सायटोकीन स्टॉर्म सुद्धा बघायला मिळालं. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या एका रिपोर्टनुसार, हे एकप्रकारचं इम्यून सिस्टीम असतं जे रक्तात अनेक सायटोकींस फार वेगाने सोडतो. हे इम्यून रिस्पॉन्सला नॉर्मल करण्यासाठी प्रभावी मानलं जातं. या टास्क फोर्सचे निर्देशक संजय ओक यांनीही असाच सल्ला दिला आहे.

सध्या संक्रमणाचा धोका बघता जर या गोष्टीकडे गंभीरतेने पाहिलं तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात येणाऱ्या रूग्णांना कमीत कमी 20 दिवसांपर्यंत दूरच ठेवलं पाहिजे. सध्या याचे काही ठोस पुरावे नाहीत की, कोरोना व्हायरस सर्वच रूग्णांमध्ये 28 दिवस राहतो. त्यामुळे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेल्या सूचनांचं कडक पालन करावं.

कोरोना रुग्णांसाठी 1.5 रुपयांचं औषध ठरतंय लाभदायक, डॉक्टरांची आशा वाढली

कोरोना विषाणूंमुळे मेंदूवर होतोय तीव्र परिणाम; 'या' आजारांच्या जाळ्यात अडकत आहेत लोक

Web Title: Coronavirus : Special Task force member warns that coronavirus complete his cycle in 28 days not in 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.