तुम्हालाही सतत मास्क लावल्यानंतर गुदमरतं का? मग हा खास 'स्प्रे' ठरेल फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:27 PM2020-04-28T17:27:18+5:302020-04-28T17:38:05+5:30

या स्प्रेच्या वापराने मास्क लावल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होणार नाही.

CoronaVirus : This spray made by helps to wearing mask but not trouble in breathing research myb | तुम्हालाही सतत मास्क लावल्यानंतर गुदमरतं का? मग हा खास 'स्प्रे' ठरेल फायदेशीर

तुम्हालाही सतत मास्क लावल्यानंतर गुदमरतं का? मग हा खास 'स्प्रे' ठरेल फायदेशीर

Next

कोरोना व्हायरसने पसरलेल्या महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त अनेक देशांतील शास्त्रज्ञ कोरोनाची  लस किंवा पर्यायी औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान  लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे लोक फक्त कामापुरता घराबाहेर पडत आहेत. जीवनावश्यक सामन आणण्यासाठी जात असताना मास्कचा वापर करणं गरजेचं आहे.

सवय नसल्यामुळे अनेकांना मास्क तोंडाला लावल्यानंतर काहीवेळाने गुदमरायला सुरूवात होत आहे. पण  तुम्ही विचार केलाय का? रुग्णालयात कार्यरत असलेल्या स्टाफला सतत मास्क लावल्यामुळे किती अडचणींचा सामना करावा लागत असेल. मास्क वापरल्यामुळे अनेकदा जीव घाबराघुबरा होऊन गुदमरतं.

एनबीआरआय च्या संशोधकांनी एक असा हर्बल स्प्रे तयार करण्याचा दावा केला आहे. त्या  स्प्रेच्या वापरामुळे गुदमरण्याची समस्या जाणवणार नाही. शास्त्रज्ञांच्यामते या स्प्रेचा वापर केल्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. यात औषधी गुणधर्म असून पानांचा आणि सुंगधित फुलांचा वापर करण्यात आला आहे. ( हे पण वाचा-तुम्ही इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड खाताय का?; असा ओळखा फरक)

एनबीआरआयच्या वरिष्ठ तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्यसेवेतील कर्मचारी वर्गाला जास्तवेळ मास्कचा वापर करावा लागतो. त्यामुळे गुदमरण्याचा त्रास होऊ नये म्हणून हा स्प्रे तयार करण्यात आला आहे. या स्प्रेच्या वापराने मास्क लावल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होणार नाही. सुंगधित झाडांपासून तयार केल्यामुळे हा स्प्रे सुरक्षित आहे. या स्प्रेच्या वापरामुळे श्वसनतंत्र पूर्णपणे मोकळं होतं. श्वसनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. ( हे पण वाचा-'या' औषधाने फक्त २ दिवसात मरेल कोरोनाचा विषाणू; तज्ज्ञांचा दावा)

Web Title: CoronaVirus : This spray made by helps to wearing mask but not trouble in breathing research myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.