तुमच्या 'या' सवयींकडे दुर्लक्ष केल्याने अडकू शकता कोरोनाच्या जाळ्यात, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:25 PM2020-04-15T13:25:24+5:302020-04-15T13:31:29+5:30
लॉकडाऊनचं पालन करण्याप्रमाणेच वैयक्तीक स्वच्छतेकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेच आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरासह भारतात सुद्धा प्रचंड वेगाने होत आहे. कोरोनापासून लोकांना वाचवता यावं यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात करण्यात आले. लॉकडाऊनचं पालन करण्याप्रमाणेच वैयक्तीक स्वच्छतेकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेंच आहे. कारण लॉकडाऊनचं पालन करत असाताना सुद्धा तुमच्या रोजच्या काही चुकांमुळे कोरोनाचे शिकार होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला काही सवयी सांगणार आहोत. ज्या तुम्ही आजचं बदलायला हव्यात.
चादरी, कपडे धुवा
सध्या कोरोना व्हायरसचं संक्रमण लक्षात घेता तुम्ही आठवड्यातून किमान २ वेळा बेडशीट धुणं गरजेच आहे. घातलेले कपडे रोजच्या रोज धुवून स्वच्छ ठेवा. बाहेर जाऊन आल्यानंतर त्याच कपड्यांवर घरात फिरू नका. ते कपडे बदलून फ्रेश होऊन मगच घरात वावरा.
शेअर करून खाऊ नका
घरी कुटुंबासोबत, ऑफिसमध्ये मित्रमैत्रिणींसोबत आपण जेवण शेअर करून खात असतो. पण सध्याच्या परिस्थितीतत असं करणं तुमच्याासाठी हानीकारक ठरू शकतं. म्हणून शेअर करून खाऊ नका.
बाथरुममध्ये टुथब्रश ठेऊ नका
कोरोनापासून बचावासाठी स्वतःची स्वच्छता राखणं अतिशय गरजेच आहे. पण ब्रश केल्यानंतर तो बेसीनवर किंवा बाथरुममध्ये ठेवण्याची सवयीमुळे तुम्हा आजारी पडू शकता. या ठिकाणी अनेकादा बॅक्टेरियांची वाढ होते. जे तोंडातून तुमच्या शरीरात जाऊ शकतात. म्हणून आधीच सावधातना बाळगणं गरजेचं आहे.
नखं खाणं
आपल्या नखांमध्ये अनेकदा बॅक्टेरीया राहू शकतात. त्यामुळे न धुता जर आपण हात तोंडात घातले. तर हे बॅक्टेरिया तोंडावाटे आपल्या शरीरात जातात. व्हायरसच्या संक्रमणाला तुमची ही सवय कारणीभूत ठरू शकते. म्हणून नखं खाण्याची सवयं सोडा.
खाल्यानंतर दातांना हात लावणं
अनेकदा खाल्यानंतर आपल्या दातात काही ना काही अडकून राहतं. अनेकांना हे बोटांनी साफ करण्याची सवय असते. पण ही सवय वेळीच सोडा. कारण यामुळे बॅक्टेरियाचं इन्फेशन होऊ शकतं.
चेहरा आणि केसांना हात लावणं
सतत चेहरा आणि केसांना हात लावल्यामुळे इन्फेक्शन पसरू शकतं. केसांमधील बॅक्टेरीया हातांमार्फत तुमच्या शरीरात जाऊ शकता. एखाद्या इन्फेक्टेड वस्तुला हात लावल्यानंतर त्वचेला लावल्यामुळे इन्फेक्शन पसरण्याची शक्यता असते.