CoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 08:15 PM2021-06-15T20:15:07+5:302021-06-15T20:16:59+5:30
गामालेया सेंटरने कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात केलेले अध्ययन आंतरराष्ट्रीय समीक्षा जरनलमध्ये प्रकाशित करण्यासाठी सादर केले आहे. या अध्ययाच्या हवाल्यानेच स्पूतनिक व्हीने हा दावा केला आहे.
नवी दिल्ली - भारतात आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात स्पुतनिक व्ही लस, इतर कुठल्याही लशीच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यासंदर्भात कंपनीने म्हटले आहे, की आतापर्यंत जेवढ्या लशींनी कोरोनाच्या या स्ट्रेनसंदर्भात परिणाम जारी केले आहेत, त्यांत सर्वात चांगले परिणाम स्पूतनिक व्ही लशीचे आहेत. (CoronaVirus Sputnik v is more efficient against the delta variant of coronavirus than any other vaccine)
गामालेया सेंटरने कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात केलेले अध्ययन आंतरराष्ट्रीय समीक्षा जरनलमध्ये प्रकाशित करण्यासाठी सादर केले आहे. या अध्ययाच्या हवाल्यानेच स्पूतनिक व्हीने हा दावा केला आहे.
स्पुतनिक लसीला लोकांकडून थंड प्रतिसाद; २२ दिवसांत २४,७१३ डोस
भारतात स्पूतनिक व्ही लशीला आपत्कालीन वापरासाठी परवाणगी देण्यात आली आहे. आता 20 जूनपासून ही लस सर्वसामान्य नागरिकांना टोचली जाईल. गेल्या रविवारी अपोलो रुग्णालयातील 170 सदस्यांना ही लस देण्यात आली. यापूर्वी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजच्या कर्मचाऱ्यांना ही लस लावण्यात आली.
किती असेल लशीची किंमत -
ऑगस्टपासून स्पुतनिक व्ही लसीचे भारतातच उत्पादन केले जाणार असून, वार्षिक 850 दशलक्ष डोसचे उत्पादन करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. स्पुतनिक व्ही ही लस उणे (-) 20 सेंटिग्रेड तापमानात साठवून ठेवावी लागते. डॉ. रेड्डीजने 750 संस्थांशी करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ओपोलो रुग्णालयासोबत करार करून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. स्पुतनिक व्हीच्या एका डोसची किंमत 1,145 रुपये एवढी असेल.
Corona Vaccination : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बाे शीतगृह, जागेची चाचपणी सुरू