मोठ्या कुटुंबातील लोकांना कोरोनाचा धोका जास्त? जाणून घ्या अफवा आणि फॅक्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 03:21 PM2020-06-14T15:21:57+5:302020-06-14T15:25:20+5:30
कोरोनाच्या प्रसाराबाबत माहिती असल्यास दैनंदिन जीवन जगत असताना संभ्रमाचं वातावरण निर्माण होणार नाही.
कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा सध्याच्या काळात परसत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाबाबत नवनवीन माहिती संशोधनातून समोर येत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनाशी निगडीत असलेल्या दाव्याबाबत फॅक्टस सांगणार आहोत. जेणेकरून दैनंदिन जीवन जगत असताना कोरोनाबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण होणार नाही.
दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांनी मास्क वापरणं अनिवार्य आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी मास्कचा वापर करणं योग्य नाही. कारण लहान मुलं स्वतः मास्क घालू किंवा काढू शकत नाही. जर मास्कमुळे काही त्रास होत असेल तर ते आपल्या हाताने मास्क काढूही शकत नाही. तसं सांगूही शकत नाही. वयस्कर व्यक्ती, मोठी माणसं यांच्या तुलनेत लहान मुलांना संक्रमणाचा धोका कमी असतो कारण त्यांची काळीज जास्त घेतली जाते. त्यामुळे दोन वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना मास्क लावू नये.
चाचणी निगेटिव्ह आल्यास कोरोनाचा धोका नसतो
तज्ज्ञांनी दिलेल्या माहीतीनुसार १० ते ३० टक्के चाचण्यांचा रिपोर्ट चुकीचा येण्याची शक्यता असते. स्वॅब टेस्ट व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा त्यात विषाणूंचे नमुने दिसून न आल्यामुळे रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. टेस्ट निगेटिव्ह आली असेल तरी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही स्वतःला क्वारंटाईन करायला हवं.
मोठ्या कुटुंबांमध्ये संक्रमण पसरण्याचा धोका जास्त
लांसेंटद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणाची सात कारणं समोर आली आहेत. त्यापैकी सगळ्या जास्त लोक एकाच ठिकाणी राहणे, लठ्ठपणा आणि क्रोनिक किडनी आजारांमुळे संक्रमणाचा धोका जास्त असतो. या अभ्यासातून कोरोनाचा धोका मोठ्या कुटुंबातील लोकांना जास्त असतो याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पसरत असलेल्या संक्रमणाची तीव्रता कमी असते.
CoronaVirus: मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचा काही उपयोग नाही; जर रोज करत असाल 'या' चुका
'या' अवयवांना सतत हात लावणं ठरू शकतं कोरोना संक्रमणाचं मोठं कारणं; 'अशी' घ्या काळजी