CoronaVirus : खुशखबर! भारतातील सगळ्यात वयस्कर दाम्पत्याने कोरोनावर केली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 10:27 AM2020-04-01T10:27:39+5:302020-04-01T10:34:23+5:30
तुम्हाला कोरोनाच्या जाळ्यातून सुखरूप सुटका झालेल्या एका वयोवृध्द दाम्पत्याबद्दल सांगणार आहोत.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतात सुद्धा मृत होत असलेल्या व्यक्तींचाआकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण ठिकठिकाणी आढळून येत आहेत. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या जाळ्यातून सुखरूप सुटका झालेल्या एका वयोवृध्द दाम्पत्याबद्दल सांगणार आहोत.
सुरूवातील जेव्हा या पती- पत्नीला वेगळं करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी ते डॉक्टरांवर खूप नाराज होते. या आजााराने ग्रस्त असलेल्या वयोवृध्द महिलेचं वय ८८ वर्ष असून तिच्या पतिचं वय ९० वर्ष आहे. हे दोघंजण कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असं दिसून येत आहे की ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असतो. मृत्यू होत असलेल्या लोकांमध्ये वयस्कर लोक अधिक असले तरी हे दाम्पत्य या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरला हरवून युध्द जिंकणारे हे सगळ्यात वयस्कर दाम्पत्य आहे. कोट्टयम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील डॉक्टर त्यांना फादर असं म्हणत असतं. या दाम्पत्याला तीन आठवड्यांआधी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. दोघांचीही कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली होती. हे दोघं त्यांची मुलगी आणि जावयाच्या संपर्कात होते. यांना इटली कपल असं सुद्धा म्हटलं जातं. कारण चार आठवड्यांआधी हे कपल्स इटलीवरून आले होते. एक मोठी टीम तैनात करून या कपल्सना शोधून काढलं होतं. कारण एअरपोर्टवरून स्क्रिनिंगपासून वाचून ते दोघं निघाले होते. त्यांच्यामुळे या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली.
या दाम्पत्याला जेव्हा ग्लास पार्टीशियनच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. तेव्हा या रुग्णाची प्रकृती खालावली होती. त्यावेळी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. २४ तासांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा घडून आली. नंतर व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. त्यांना बेडवर ठेवणं कठीण झालं होतं. कारण त्यांना सतत बेडवरून उतरून खाली यावसं वाटत होतं. डॉक्टरांनी असं सांगितलं की आईसीयूमध्ये असताना मास्क आणि इतर मेडिकल इक्विप्मेंट्समुळे त्यांना व्यवस्थित दिसत नव्हतं. पण आवाज ओळखून ते नर्सला ओळखत होते.
या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी फक्त उपचार केले नाहित तर त्यांच्या डाएटची सुद्धा काळजी घेतली. अखेर या दाम्पंत्यांच्या जावयाला आणि मुलीला सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवस निरिक्षणाखाली ठेवल्यानंतर या कोरोनाच्या जाळ्यातन सुखरूप सुटका झालेल्या दाम्पत्याला घरी सोडण्यात येईल.