लक्षणं दिसताच चाचणी केल्यास रिपोर्ट येऊ शकतो निगेटिव्ह; योग्य रिपोर्टसाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 11:14 AM2020-06-12T11:14:25+5:302020-06-12T11:20:08+5:30
संशोधकांनी रुग्णांच्या लाळेचे १ हजारापेक्षा जास्त नमुने घेऊन हे परिक्षण केले होते.
कोरोना व्हायरसची माहामारी अनेक महिने उलटून गेल्यानंतरही आटोक्यात येत नाही. चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतासह संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना कधी नष्ट होणार याबाबत कोणालाही पूर्ण माहिती नाही. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत नवीन माहिती समोर येत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर लक्षणं दिसत असल्यास व्यक्तीने लगेचच तपासणी केली तर कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो. तसचं व्हायरसच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवता येऊ शकतं.
लक्षणं दिसल्यानंतर तीन दिवसांनी टेस्ट करणं
एका रिसर्चमध्ये तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लक्षण दिसल्यानंतर तीन दिवसांनी चाचणी करणं फायदेशीर ठरेल. याबाबतची माहिती एंजल ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. अमेरिकेतील जॉन हॉप्किन्स विद्यापिठातील संशोधकांनी रुग्णांच्या लाळेचे १ हजारापेक्षा जास्त नमुने घेऊन हे परिक्षण केले होते.
टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे इतरांनाही असू शकतो धोका
एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणं दिसत असतील आणि तरीही टेस्ट निगेटिव्ह आली असेल तर संक्रमणाचा धोका जास्त असतो. त्यामुळे इतरांना नुकसान पोहोचू शकतं. लक्षणं दिसल्यानंतर चार दिवसांनी चाचणी केली तर निगेटिव्ह असण्याची शक्यता असते. त्यामुळे संक्रमण वाढत जाऊन इतरांना आपल्यामुळे धोका उद्भवू शकतो.
त्यामुळे आठ दिवसांनंतर तपासणी करायला हवी. जेणेकरून योग्य परिणाम दिसून येतील. कोरोना व्हायरसमुळे जगभरातून आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे. तर संक्रमणाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही संक्रमणाचा वेग वाढताना दिसून येत आहे. अशा स्थितीत रोगाशी लढण्यासाठी कोरोनाची चाचणी लगेचच न करता आठ दिवसांनी करावी.
मोठं यश! 'या' कंपनीच्या लसीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी; लवकरच माणसांवर परिक्षण होणार
पावसाळ्यात घश्यातील खवखवीमुळे कोरोनाचा धसका घेण्याआधी; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा