Coronavirus : वैज्ञानिकांनी सांगितले 'ही' आहेत कोरोनाची दोन मु्ख्य लक्षणे, दिसताच लगेच डॉक्टरांना करा संपर्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 10:34 AM2020-06-26T10:34:02+5:302020-06-26T10:46:53+5:30
हा रिसर्च ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिड्समधील वैज्ञानिकांनी केला. या वैज्ञानिकांनी 9 देशातील 24 हजार रूग्णांवर रिसर्च केला.
कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. दररोज हजारो नवीन केसेस समोर येत आहेत. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसबाबत रिसर्चमधून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाची आतापर्यंत वेगवेगळी लक्षणे सांगण्यात आली आहेत. काही लक्षणे सतत बदलतही आहेत. अशात आता एका रिसर्चमधून कोरोना व्हायरसच्या दोन मुख्य लक्षणांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. सतत खोकला आणि ताप ही दोन कोरोनाची दोन मुख्य लक्षणे असल्याचं सांगण्यात आलं आहे.
theweek.in ने दिलेल्या वृत्तानुसार, 'पीएलओएल वन' जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये ही दोन प्रमुख लक्षणे असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच यात थकवा, चव न लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांचाही समावेश आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलेली लक्षणेच WHO ने आधी जाहीर केली होती.
24 हजार रूग्णांवर रिसर्च
(Image Credit : thailandmedical.news)
हा रिसर्च ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिड्समधील वैज्ञानिकांनी केला. या वैज्ञानिकांनी 9 देशातील 24 हजार रूग्णांवर रिसर्च केला. या रूग्णांमध्ये दिसलेल्या सामान्य लक्षणांची ओळख पटवण्यासाठी 148 वेगवेगळ्या रिसर्चची आकडेवारी बघितली. या 9 देशांमध्ये ब्रिटन, चीन आणि अमेरिकेचा समावेश आहे.
वैज्ञानिकांनी सांगितले की, हा रिसर्च कोविड 19 बाबत करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या समीक्षेपैकी एक आहे. वैज्ञानिकांनी हे मान्य केलंय की, अशा लोकांचीही मोठी संख्या आहेत, ज्यांच्यात लक्षणे नाहीत पण त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ताप आहे सर्वात मोठं लक्षण
लीड्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये सर्जन आणि क्लिनिकल रिसर्च फेलो वेड म्हणाले की, 'या विश्लेषणातून हे स्पष्ट होतं की, कोविड-19 ने संक्रमित लोकांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांमध्ये खोकला आणि ताप सामान्य लक्षणं होती'. रिसर्चमधून समोर आले की, 24410 केसेसमध्ये 78 टक्के लोकांना ताप होता तर 57 टक्के लोकांना खोकला होता.
ICMR ने सांगितली दोन नवीन लक्षणे
तशी तर कोरोनाची मुख्य लक्षणे खूप ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही आहेत. पण ICMR ने नुकतीच कोरोना व्हायरस लक्षणांची लिस्ट अपडेट केली. ज्यात त्यांनी काही नवीन लक्षणांचा समावेश केला.
या लिस्टमध्ये कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये आता मांसपेशींमध्ये वेदना होणे, घशात कफ तयार होणे, नाक बंद होणे आणि घशात खवखव होणे, घशात वेदना होणे, डायरिया ही लक्षणे आधीच जोडण्यात आली होती. पण आता यात दोन नवीन लक्षणांचा समावेश करण्यात आलाय. जसे की, टेस्ट न लागणे किंवा सुंगध न येणे.
किती दिवसात दिसतात लक्षणे?
आतापर्यंत समोर आलेल्या रिसर्चनुसार, कोरोना व्हायरसची लक्षणे व्हायरसच्या संपर्कात आल्यावर 2 ते 14 दिवसाच्या आत दिसू लागता. सुरूवातील शरीरात वेदना, ताप आणि खोकला होतो. पण आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शरीरात दिसणाऱ्या आणि जाणवणाऱ्या या दोन लक्षणांआधीही दोन नवीन लक्षणे जाणवतात. जी कोरोना व्हायरस संक्रमणाची असू शकतात.
या लक्षणांकडे जास्तीत जास्त लोक दुर्लक्ष करतात. या दोन लक्षणांमध्ये व्यक्तीला काही खाताना टेस्ट लागत नाही आणि कशाचाही सुगंध येत नाही. म्हणजे कोरोना व्हायरस तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर अटॅक करण्याआधी तुमच्या टेस्टच्या ग्रंथींना नुकसान पोहोचवतो. पण सगळ्यांमध्येच ही लक्षणे दिसतात असे नाही.
चपला, बुटांसोबत तुम्ही कोरोना विषाणूही घरी आणताय का? 'अशी' घ्या काळजी
Coronavirus : CDC चा सल्ला, महामारी दरम्यान घराबाहेर पडताना 'या' 3 वस्तू न विसरता ठेवा सोबत!