कोरोनाचे लक्षणं असू शकतात घश्यातील वेदना; सर्दी, टॉन्सिल्सपासून 'असा' करा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 05:30 PM2020-06-07T17:30:58+5:302020-06-07T17:32:56+5:30
या लहान समस्या वाढू न देता कमी वेळातच नष्ट करून आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे.
कोरोनाबाधित व्यक्तीच्या खोकण्यातून शिंकण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समधून कोरोनाचा प्रसार होतो. तेव्हा फुफ्फुसांमध्ये संक्रमण होण्याआधी घशात वेदना होणं, घसा खवखवणं, सुका खोकला अशी लक्षणं जाणवतात. बदलत्या वातावरणात थंड किंवा गरम खाल्ल्याने घसा, नाक यांवर परिणाम होऊन शारीरिक समस्या उद्भवतात.
अनेकदा टॉन्सिल्समुळे घसा खवखवणं, ताप डोकेदुखी, पांढरे पॅचेस येणं, सूज येणं अशा समस्या उद्भवतात. कोरोनाची सुरूवातीची लक्षणं सुद्धा अशीच आहेत. तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल तर महागात सुद्धा पडू शकतं. म्हणून या लहान समस्या वाढू न देता कमी वेळातच नष्ट करून आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे. घशाची खवखव टाळायची असल्यास तुम्ही हा त्रास होत असलेल्या लोकांपासून दूर राहावे. कारण हा त्रास संसर्गजन्य असतो.
बचाावाचे उपाय
खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात स्वच्छ धुवा.
सतत डोळ्यांना आणि तोंडाला स्पर्श करू नका.
पाणी पिताना शक्यतो भांडे उष्टे करू नका.
रिमोट, टिव्ही, किबोर्डची नियमित साफसफाई करा. जेणेकरून धुळीशी संपर्क येणार नाही.
थंड पदार्थ खाणं टाळा.
व्हिटामीन आणि भाज्यांचा आहार घ्या.
झोपण्याआधी दररोज मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ घालून गुळण्या केल्यास आरोग्य चांगले राहील. त्यामुळे नाक, घसा निरोगी राहण्यास मदत होते.
हळद घातलेले गरम दूध प्या. जर तुम्ही चहा पीत असाल तर चहात तुळस, वेलची, आलं घालून चहा तयार करा आणि अशा चहाचे रोज सेवन करा.
जीन एडिटींग टूलने कोरोनाचा होणार खात्मा; जाणून घ्या 'या' टूलने कसा नष्ट होईल विषाणू
कोरोना काळात संजीवनी ठरतील आहारातील 'हे' पदार्थ; निरोगी राहण्यासाठी रोज करा सेवन