Coronavirus : कोरोनाच्या लढाईत मोठं यश, व्हायरसचा सामना करणाऱ्या तब्बल ६९ औषधांवर रिसर्च....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 10:39 AM2020-03-25T10:39:39+5:302020-03-25T10:46:35+5:30
भारतीय कंपनी सिपला आणि जपानी कंपनी टाकेडा फार्मा यांनी कोरोनासाठी औषध तयार करण्याचा दावा केला आहे.
चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण वाढत आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसवर कोणता उपाय किंवा औषधं शोधण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद अखेर मिळाला आहे. या लसीचे मानवी शरीरावर परिक्षण सुरू झाले आहे.
भारतीय कंपनी सिपला आणि जपानी कंपनी टाकेडा फार्मा यांनी कोरोनासाठी औषध तयार करण्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे रिसर्चकर्त्यांनी कोरोना व्हायरसशी लढत असलेल्या ६९ औषधांची तपासणी करून योग्य ठरवले आहे. मलेरियाच्या आजारात वापरली जाणारी क्लोरोक्वीन सुद्धा उपयोगी असल्याचं समोर आलं आहे. चीनमध्ये फॉस्फेटचे उत्पादनांची तपासणी करत असलेल्या एका व्यक्तीने हे सिध्द केले आहे की मलेरियाचे औषध क्लोरोक्वीन कोरोनाशी सामना करू शकतं.
अर्थात याचा वापर करणं जोखमीचं सुद्धा असू शकतं. रिसर्चकर्त्यांनी शोधलेल्या औषधांपैकी काही ओषधं ही आधी पासूनच काही आजारांच्या उपचारासाठी वापरली जात होती. रिसर्चकर्त्यांनी ज्या ६९ औषधांचा शोध घेतला आहे अशी औषधं बायोरेक्सिव वेबसाइट वर प्रकाशित झालेल्या एका अध्ययनात प्रकाशित केली आहेत. रिसर्चकर्त्यांनी कोरोना व्हायरसच्या जीन्सवर केलेल्या अभ्यासानुसार सार्स-कोव-2 (Sars-CoV-2)फुप्फुसांच्या इन्फेक्शनला कारणीभूत ठरू शकतं. ( हे पण वाचा-Hantavirus : काय आहे हंता व्हायरस आणि कसा पसरतो, जाणून घ्या लक्षणे!)
नवीन अभ्यासानुसार कोरोना व्हायरसच्या २९ जीन्सपैकी २६ जीन्सची तपासणी करण्यात आली आहे. जे व्हायरस माणसाच्या प्रोटीन्सवर प्रत्यक्ष अटॅक करत असतात. या औषधांच्या यादीत एंटीबायोटीक्सचा सुद्धा समावेश आहे. जे प्रोटीन तयार करत असलेले सेल्युलरर्सना कमी करून बॅक्टेरियांना मारत असतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी एंड इन्फेक्शंस डिजीजच्या तज्ञांच्यामते क्लोरोक्वीन कोरोनाला नष्ट करण्यासाठी सक्षम आहे. या गोष्टीचं कोणताही पुरावा मिळालेला नाही. ( हे पण वाचा-CoronaVirus :१० सेकंद श्वास रोखून धराल तर होणार नाही कोरोनाचे शिकार; खरं की अफवा?)