CoronaVirus News : कोरोनाला रोखण्यासाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीननंतर तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ प्रभावी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 09:42 AM2020-05-12T09:42:14+5:302020-05-12T09:49:18+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: तज्ज्ञांच्यामते कोरोना संक्रमित रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या दिसून आल्या आहेत.

Coronavirus treatment american scientists try blood thinners and brain therapy myb | CoronaVirus News : कोरोनाला रोखण्यासाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीननंतर तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ प्रभावी उपाय

CoronaVirus News : कोरोनाला रोखण्यासाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीननंतर तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ प्रभावी उपाय

Next

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. या जीवघेण्या व्हायसरवर लस आणि औषधं शोधण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतील संशोधकांनी या जीवघेण्या व्हायरसशी लढण्यासाठी चार नवीन उपाय सांगितले आहेत.  तज्ज्ञांच्यामते कोरोना संक्रमित रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या दिसून आल्या आहेत. या समस्येला औषधांनी कंट्रोल केलं जाऊ शकतं. कोरोनाला हरवण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी काय सांगितले आहे जाणून घ्या.

रक्तपातळ करण्याच्या गोळ्यांमुळे ५० ट्क्के सुधार

कोरोनाने संक्रमित असलेल्या रुग्णांची स्थिती औषधांच्या माध्यमातून व्यवस्थित केली जाऊ शकते. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ही औषध दिल्यास त्यांची कोरोनापासून वाचण्याची शक्यता १३० टक्क्यांनी वाढते. घट्ट रक्ताला पातळ करण्यासाठी केल्या जात असलेल्या ट्रिटमेंटला एंटी-कोएगुलेंट असं म्हणतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रक्त गोठल्यामुळे पायांच्या बोटांवर आणि मेंदूवर परिणाम होतो. ज्यामुळे रुग्णाला ब्रेन स्ट्रोक सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

एजिथ्रोमायसिन आणि निमोनिया यांचे कॉम्बिनेशन असलेले औषध 

अमेरिकन संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एजिथ्रोमाइसिन आणि निमोनिया या औषधांचे एकत्रिकरण करून तयार केलेल्या औषधांचे परिक्षण सुरू आहे. यात वापरल्या जात असलेल्या निमोनियाच्या औषधाचे नाव एटोवेक्योन आहे. एरिजोनाच्या ट्रांसलेशनल जिनोमिक्स रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये  हे परिक्षण केले जाणार आहे.

ब्रेन थेरेपी

कोरोनाच्या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी ब्रेन थेरेपी फायदेशीर ठरेल. मेंदूच्या काही भागांतून श्वास आणि रक्तभिसारणाला नियंत्रणात ठेवलं जातं. अशात ब्रेन थेरेपीचा वापर कोरोना रुग्णांवर करून रुग्णांची स्थिती चांगली करता येऊ शकते. यामुळे रुग्णाला व्हेंटिलेटरवरून सुटका मिळण्याची शक्यता असते. (उन्हाळ्यात आजारी पडायचं नसेल; तर व्हिटॅमीन 'सी' मुळे शरीराला होणारे फायदे वाचा)

प्रोस्टेट कॅन्सर थेरेपी

एन्नल्स ऑफ ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार प्रोस्टेट कॅन्सर थेरेपी घेत असलेल्या पुरूषांमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्याचं प्रमाण खूप कमी दिसून आलं. अशा लोकांना कोरोनाचं संक्रमण झाल्यास प्रकृती गंभीर नसते. 

(CoronaVirus News : कोरोना विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचू नये; यासाठी प्रभावी ठरेल 'ही' थेरेपी)

Web Title: Coronavirus treatment american scientists try blood thinners and brain therapy myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.