खुशखबर! कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी या महिन्याच्या अखेरीस औषध उपलब्ध होणार, जाणून घ्या औषधाबाबत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:06 PM2020-06-18T14:06:38+5:302020-06-18T14:18:57+5:30

या महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या उपचारांवरील औषध आपातकालीन स्थितीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

Coronavirus treatment drug remdesivir will be available in market by month end sources | खुशखबर! कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी या महिन्याच्या अखेरीस औषध उपलब्ध होणार, जाणून घ्या औषधाबाबत

खुशखबर! कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी या महिन्याच्या अखेरीस औषध उपलब्ध होणार, जाणून घ्या औषधाबाबत

Next

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कारण दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस आणि औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशातील तज्ज्ञांनी केलेले ट्रायल शेवटच्या टप्प्यात आहेत. सध्या कोरोनाच्या उपचारांबाबत एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. या महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या उपचारांवरील औषध आपातकालीन स्थितीसाठी मोठ्या प्रमाणात  उपलब्ध होणार आहे.

भारत में इन 2 दवाओं से होगा कोरोना का इलाज, सरकार ने दी मंजूरी

एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार  रेमडेसिवीर या एंटी व्हायरल औषध कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी परिणामकारक ठरले होते. रेमडेसिवीर हे औषध या महिन्याच्या अखेरीस  उपलब्ध होणार आहे. 
(Drug Controller General of India) डिसीजीआयने आपातकालिन स्थितीत   रेमडेसिवीर या औषधाचा वापर गंभीर कोरोना रुग्णांवर करण्याची परवागनी कोरोना रुग्णालयांना दिली आहेत.

 रेमडेसिवीर हे औषध गिलिड कंपनाद्वारे तयार करण्यात आले आहे.  आपातकालीन स्थितीत कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी हे औषध वापरण्यास अमेरिकेतील आरोग्य संस्था FDAकडूनही मान्यता देण्यात आली होती. या औषधांची परिणामकारकता आणि सुरक्षेच्यादृष्टीने वैद्यकिय चाचणी अजूनही सुरू आहे. सध्या केंद्राकडून  रेमडेसिवीर, टोसीलीजुमॅब  आणि प्लाज्मा थेरेपीने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास परवागनी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार  रेमडेसिवीर या औषधाचा वापर Investigational therapy साठी करण्यात येणार आहे. या औषधाच्या उपचारांबाबत अनेक अटी सुद्धा घालण्यात आल्या आहेत.

अमेरिकेतही  रेमडेसिवीरचा वापर आपातकालीन स्थिती करण्यात येत आहे. पीटीआईने आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार  गिलीड साइंसेज या कंपनीने २९ मे ला या औषधाच्या आयाती आणि निर्यातीबाबत इंडियन ड्रग रेगलेटरी एजेंसीला पत्र लिहिले होते.  वाढत्या रुग्णांची स्थिती लक्षात घेता १ जूनला आपातकालीन स्थितीत या औषधाचा वापर करण्याची परवागनी देण्यात आली. आत्तापर्यंत ६ भारतीय कंपन्यांनी भारतात औषध तयार करण्याचा दावा केला आहे. पाच कंपन्यानी गिलीड सायंजेससोबत औषध तयार करण्याची तयारी दर्शवली आहे.  

कोरोनाच्या उपचारांसाठी वापरात असेल्या 'या' औषधांचे परिक्षण थांबवले, WHO सांगितलं कारणं

कोरोनाशी लढण्याासठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवेल व्हिटामीन सी; वाचा आरोग्यवर्धक फायदे

Web Title: Coronavirus treatment drug remdesivir will be available in market by month end sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.