दिलासादायक! कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतेय 'ही' नवी थेरेपी, असा होणार बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 09:50 AM2020-11-01T09:50:03+5:302020-11-01T10:03:24+5:30

CoronaVirus News & latest Updates : या थेरेपीच्या वैद्यकिय परिणामांना न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

Coronavirus treatment monoclonal antibodies treat covid-19 safer than plasma therapy finds study | दिलासादायक! कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतेय 'ही' नवी थेरेपी, असा होणार बचाव

दिलासादायक! कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतेय 'ही' नवी थेरेपी, असा होणार बचाव

googlenewsNext

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांचे उपचार केले जात आहेत. जोपर्यंत लस किंवा औषध येत नाही तोपर्यंत सगळ्याच गोष्टींबाबत सावधगिरी बाळगायला हवी. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सध्या एंटीबॉडी  थेरेपीचा वापर करून रुग्णांना नोवेल एंटीबॉडी दिली जात आहे. या थेरेपीच्या वैद्यकिय परिणामांना न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

या उपचार पद्धती अंतर्गत संक्रमणातून मुक्त झालेल्या कोरोना रुग्णांच्या रक्तात असलेल्या मोनोक्लोनल एंटीबॉडीजची तपासणी करण्यात आली होती. एलवाई-सीओवी 555’ च्या तीन वेगवेगळ्या डोसची तपासणी करण्यात आली होती. या अभ्यासातून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २, ८०० मिलीग्राम एंटीबॉडीमुळे सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांच्या शरीरातील प्रभाव कमी होतो. 

अमेरिकेतील सीडर- सिनाई मेडिकल सेंटरमध्ये कार्यरत असलेले या अभ्यासाचे सह लेखक पीटर चेन यांनी सांगितले की, ''माझ्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण  संशोधन म्हणजे कोरोना रुग्णांची रूग्णालयात भरती करण्याची शक्यता कमी होणं. मोनोक्लोनल एंटीबॉडीमध्ये कोरोना रुग्णांच्या संक्रमणाची गंभीरता कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे जास्तीत जास्त कोरोना रुग्ण हे रुग्णालयात दाखल न होता घरच्याघरी बरे होऊ शकतात.'' संशोधकांच्या मते मोनोक्लोनल एंटीबॉडी कोरोना व्हायरसला चिकटलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे वाढ होण्यापासून रोखता येऊ शकतं. 

प्रतीकात्मक तस्वीर

पुढे त्यांनी सांगितले की,'' ‘एलवाई-सीओवी 555’ नोवेल कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनशी जोडलेले असते. मानवी शरीरात प्रवेश  करण्यासाठी याची गरज भासते. संशोधकांना असं दिसून आलं की एंटीबॉडी व्हायरस आपल्या प्रतिकृती तयार करण्याची  क्षमता कमी करतात. त्यामुळे संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. सुरूवातीलाच व्हायरसला शरीराला नुकसान पोहोचवण्यापासून रोखता येऊ शकतं.''  या अभ्यासासाठी  जवळपस ३०० रुग्णांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. यात १०० रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडीज इन्जेक्ट करण्यात आल्या होत्या. जवळपास  १५० रुग्णांना  प्रायोगिक तत्वावर ही थेरेपी देण्यात आली होती. CoronaVirus : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दुप्पट सुरक्षा देतील हे २ उपाय; शास्त्रज्ञांचा दावा

दरम्यान कॉलेज लंडन आणि मार्केट रिसर्च फर्म इम्पोसिस मोरी यांनी दावा केला आहे की, लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये व्हायरसच्या एंटीबॉडीज कमी वेळात नष्ट होतात. लक्षणं नसलेल्या रुग्णांना पुन्हा संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. 

मंगळवारी प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार इंपीरियल कॉलेजसह इम्पोसिस मोरी या संशोधकांनी दावा केला आहे की, ७५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांपासून १८ ते २४  वयोगटातील रुग्णांमध्ये 'लॉस ऑफ एंटीबॉडीज' ही क्रिया संथ गतीने होते. जूनचा मध्य ते सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत इंग्लँडमध्ये लाखो लोकांच्या नमुन्यांवर परिक्षण करण्यात आले होते. त्यात असं दिसून आलं की, एंटीबॉडी असलेल्या लोकांची संख्या जवळपास तीन महिन्यात २६.५ टक्क्यांनी कमी झाली होती. 

पॉझिटिव्ह बातमी! आता १२ ते १८ वयोगटातील तरूणांवर होणार लसीची चाचणी; जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचा निर्णय

साहाय्यक आरोग्य अधिकारी जेम्स बॅथेल यांनी सांगितले की,  ''हा या शोधाचा महत्वपूर्ण भाग आहे. ज्यामुळे कोविड १९ च्या एंटीबॉडीचा प्रभाव समजण्यास मोठी मदत होऊ शकते. वैज्ञानिकांनी धोक्याचा इशारा देत सांगितले की, व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेली लॉग्न टर्म एंटीबॉडीबद्दल अजूनही पूर्ण माहिती समोर आलेली नाही. '' Coronavirus: खबरदार कोणाला सांगाल तर...; चीनमध्ये छुप्यापद्धतीने लोकांना कोरोना लस दिली जातेय?

Web Title: Coronavirus treatment monoclonal antibodies treat covid-19 safer than plasma therapy finds study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.