आता हवेमार्फत वाढणारा कोरोना प्रसाराचा धोका होणार कमी; शास्त्रज्ञांनी शोधला उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 04:32 PM2020-12-04T16:32:27+5:302020-12-04T17:04:50+5:30
CoronaVirus News & Latest Updates : एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.
कोरोना व्हायरसने गेल्या १० ते ११ महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या हसण्यातून, खोकण्यातून किंवा शिंकण्यातून संक्रमित ड्रॉपलेट्स उडाल्यामुळे कोरोना संक्रमण इतरांपर्यंत पोहोचते. मात्र आता हवेमार्फत पसरणाऱ्या कोरोनाचा (Aerosolised Coronavirus) धोकाही नाकारता येत नाही. म्हणजे कोरोनाव्हायरस असलेले तोंडातील ड्रॉपलेट्स हवेत विशिष्ट कालावधीसाठी राहतात आणि विशिष्ट ठिकाणापर्यंत तरंगत जातात. ज्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो. या माध्यमातून होणारा कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा हा प्रश्न निर्माण होतो.
सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन अनेक ठिकाणी पूर्णपणे होताना दिसून येत नाही. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टेंसिंग पाळलं जात असलं तरी घरी तेवढ्या प्रमाणात लोक सोशल डिस्टेंसिंग पाळत नाहीत. अशावेळी एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे.
सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी अनेक वर्षांपासून यूव्हीसी प्रक्रिया वापरली जाते पण त्यामुळे मोतीबिंदू किंवा त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. मात्र त्या तुलनेत कमी क्षमतेची far-ultraviolet C (UVC) सुरक्षित असल्याचे पुरावे संशोधकांना सापडले आहेत. कमी क्षमतेचं फार-अल्ट्राव्हायोलेट लायटिंग C (UVC) वापरल्यास खोलीतील हवा निर्जंतुक करता येऊ शकते ज्यामुळे रुममध्ये व्हेंटिलेशनमुळे होणाऱ्या निर्जंतुकीकरणाच्या तुलनेत ५० ते ८५ टक्क्यांची वाढ होऊ शकते असं कॉम्प्यूटेशनल मॉडेलिंगच्या माध्यमातून दिसून आलं आहे.
हिवाळ्यात मेथीच्या सेवनाचे 'हे' ७ फायदे वाचून व्हाल अवाक्, आजारांपासून लांब राहण्याचा सोपा फंडा
यूकेमधील क्रॅनफिल्ड विद्यापीठातील लिआंग यांग तज्ज्ञ हे या अभ्यासातील प्रमुख संशोधक आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार. जिथं सोशल डिस्टन्सिंग पाळता येणार नाही अशा बंद खोल्यांमध्ये कोरोना विषाणू एअरोसोलच्या माध्यमातून पसरून संक्रमित करू शकतो. आता फार-यूव्हीसी लायटिंगमुळे सुरक्षित, कमी खर्चाच्या पद्धतीने कोरोनाचं संक्रमण रोखण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. हॉस्पिटल्स, वैद्यकीय सेवा केंद्र अशा ठिकाणी सी (यूव्हीसी) चा निर्जंतुकीकरणासाठी वापर करता येऊ शकतो.
तुम्हीसुद्धा मधाच्या नावाखाली चायनीज शुगर सिरप विकत घेताय का? फसवणूक होण्याआधीच जाणून घ्या सत्य
पुढे त्यांनी सांगितले की, ''या पद्धतीनं हवेतील विषाणूंचा नाश करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. जिथं हवा खेळती राहू शकत नाही. तिथं फार-यूव्हीसी इल्युमिनेशनचा कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी तितकाच उपयोग होईल जितका N95 मास्कचा होतो.'' असं मत या संशोधनाबाबत तज्ज्ञांनी मांडलं आहे.