Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! अनेक जण वापरणाऱ्या नेबुलायझरपासून सावधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:15 PM2020-05-05T23:15:17+5:302020-05-05T23:15:27+5:30

या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातून साध्या सर्दी-खोकल्यासाठी नेबुलायझर ही परंपराच हद्दपार करावी.

Coronavirus: Understand ‘Corona’! Beware of nebulizers that many people use | Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! अनेक जण वापरणाऱ्या नेबुलायझरपासून सावधान

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! अनेक जण वापरणाऱ्या नेबुलायझरपासून सावधान

Next

डॉ. अमोल अन्नदाते

आपल्याकडे वर्षानुवर्षे सर्दी- खोकल्यासाठी रुग्णालयात किंवा घरी नेबुलायझरने वाफ घेणे सुरू आहे. खरे तर दमा व अ‍ॅलर्जी सोडून इतर नियमित येणाºया ताप, सर्दी, खोकल्याला अशा नेबुलायझरमधून वाफ घेण्याची गरज नसते. यातून बाळाच्या पालकांना फक्त खोकल्यासाठी काही तरी करत असल्याचे मानसिक समाधान मिळत असते. आता तर दम्याच्या रुग्णांनाही फक्त इन्हेलर म्हणजे मीटर्ड डोस इन्हेलरचाच वापर करावा व त्यांच्यासाठी ही नेबुलायझरची गरज नाही, असे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे सांगतात. सध्या ‘कोविड-१९’ साथीच्या काळात तर हॉस्पिटल- क्लिनिकच्या वेटिंग रूममध्ये कोपºयात असलेल्या एकाच नेबुलायझरमधून अनेक मुलांना नेबुलायझेशन देणे घातक ठरू शकते.

या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातून साध्या सर्दी-खोकल्यासाठी नेबुलायझर ही परंपराच हद्दपार करावी. नेबुलायझर वापरण्याची वेळ येतच असेल, तर बाळासाठी नवा आणि वेगळा नेबुलायझर वापरावा. नेबुलायझरचा सर्वांत मोठा धोका म्हणजे बाधित रुग्ण इतरांसमोर, ते इतरांसमोर वापरत असल्यास यातून उडणारे श्वासाचे कण अधिक दूरवर उडून इतरांनाही संसर्ग करू शकतात. निदान झालेल्या रुग्णाला नेबुलायझरचा वापर करावा लागलाच, तर तो बंद खोलीमध्येच करावा. नंतर ही जागा सोडियम हायपोक्लोराईट ने निर्जंतुक करावी. घरात दोन मुले असतील, तर त्यांचेही नेबुलायझर एकमेकांना वापरू नये. एकाच घरात दम्याचे रुग्ण असतील तर सर्वांनी वेगवेगळे इन्हेलर वापरावे. नेबुलायझरप्रमाणे इन्हेलरमधून श्वासाचे कण बाहेर उडत नाहीत. उपयोगी असलेल्या इन्हेलरची सवय लागेल का, अशी शंका पालकांना असते; पण फारसे उपयोगाचे नसलेले नेबुलायझर मात्र त्यांना हवेहवेसे असते. कोरोनाच्या निमित्ताने हे सर्व गैरसमज दूर झाले पाहिजे.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: Coronavirus: Understand ‘Corona’! Beware of nebulizers that many people use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.