Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! एन-९५ मास्क निर्जंतुक करून परत कसे वापरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 01:31 AM2020-05-09T01:31:09+5:302020-05-09T07:18:36+5:30

निर्जंतुकीकरणाच्या या दोन्ही पद्धती फक्त एन-९५ मास्क साठीच आहेत व कापडी, सर्जिकल व इतर मास्कसाठी नाहीत, याची नोंद घ्यावी

Coronavirus: Understand ‘Corona’! How to disinfect and re-use N-95 mask? | Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! एन-९५ मास्क निर्जंतुक करून परत कसे वापरणार?

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! एन-९५ मास्क निर्जंतुक करून परत कसे वापरणार?

Next

डॉ. अमोल अन्नदाते

सध्या रुग्णालयांसह सगळी कडे एन ९५ मास्कचा तुटवडा आहे. पण जर तुमच्याकडे ५ एन ९५ मास्क असतील तर तुम्ही घरच्या घरी निजंर्तुकीकरण करून एका व्यक्ती साठी वारंवार वापरू शकता. अनेक डॉक्टर ही अशा प्रकारे मास्क वापरत आहेत. हे पुढील प्रमाणे करता येईल...
अ. ५ मास्कला १ ते ५ असे नंबर द्यावे.
ब. गॅलरीमध्ये/मोकळ्या हवेत ४ कागदी पिशव्या दोरीला लटकवून ठेवा व त्यांना १ ते ४ नंबर द्या.
क. शक्यतो जिथे या पिशव्या लटकवलेल्या असतील तिथे फार धूळ नसेल असे बघा.
ड. पहिल्या दिवशी मास्क वापरून झाल्यावर तो १ नंबरच्या पिशवीत टाका. दुसऱ्या दिवशी नवीन मास्क वापरा. वापरून झाल्यावर २ नंबरच्या पिशवीत टाका. अशा प्रकारे चौथा दिवस येईल तेव्हा पाचवा मास्क वापरा व तो वापरून झाल्यावर १ नंबरच्या पिशवीत टाका व १ नंबरच्या पिशवीतील मास्क वापरा.
इ. याचा अर्थ एक मास्क घातलेला असेल व चार सदैव पिशवीत असतील.
फ. मोकळ्या वाºयात मास्क ७२ तासात निर्जंतुक होतो. यासाठी त्याला दिवस (एक दिवस अधिक) वापरण्या आधी मिळतो आहे.
ग. या मास्कचा सूर्य प्रकाशाशी संबंध येऊ देऊ नका. कारण सूर्य प्रकाशात एन-९५ मास्कची उपयुक्तता नष्ट होते.
जर मास्क एकच असेल तरी तो घरी निजंर्तुक करता येतो पण याची प्रक्रिया जरा किचकट व करायला अवघड आहे. यासाठी स्वयंपाक घरातील ओव्हनचा वापर केला जाऊ शकतो. ओव्हनमध्ये इतर कुठे ही मेटलशी मास्कचा संपर्क न येता, लाकडी क्लिपच्या सहाय्याने ती लटकवून ठेवावी. ओव्हन बंद करून ७० डीग्री तापमानावर ३० मिनिटे ओव्हन चालू ठेवावे. एवढा वेळ व तापमान एन-९५ मास्कला निर्जंतुक करण्यास पुरेसा आहे. यासाठी प्लास्टिकची क्लिप वापरू नये.

(निर्जंतुकीकरणाच्या या दोन्ही पद्धती फक्त एन-९५ मास्क साठीच आहेत व कापडी, सर्जिकल व इतर मास्कसाठी नाहीत, याची नोंद घ्यावी)

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: Coronavirus: Understand ‘Corona’! How to disinfect and re-use N-95 mask?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.