भय इथले संपत नाही! महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त जीवघेणा; तज्ज्ञ म्हणाले की...
By manali.bagul | Published: February 23, 2021 12:52 PM2021-02-23T12:52:41+5:302021-02-23T13:10:11+5:30
CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये वाढत असताना आता एक चिंताजनक बाब समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतासह राज्यभरात कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का? अशी भिती अनेकांना वाटत आहे. कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये वाढत असताना आता एक चिंताजनक बाब समोर आली आहे. देशात एकूण २४० नवीन करोना स्ट्रेन आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात आढळेला कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून हा स्ट्रेन घातक ठरू शकतो असा इशारा दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलिरेया यांनी दिला आहे. या नवीन स्ट्रेनमुळे कोरोनाच्या एंटीबॉडीज तयार झालेल्यांनाही कोरोनाचा सामना करावा लागू शकतो. अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
हर्ड इम्युनिटीबद्दल बोलताना गुलेरिया यांनी सांगितले की,''म्युटेशन्समध्ये किंवा नवीन स्ट्रेनमध्ये प्रतिकार शक्तीपासून बचावाची क्षमता तयार झाली आहे. त्यामुळे लसीमुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या आणि अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या माणसांनाही त्यापासून धोका होण्याची शक्यता आहे,'' असा अंदाज गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही कोरोनाच्या उद्रेकाविषयी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. देशभरात करोनाचे २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळेच करोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असून, महाराष्ट्रातही मागील आठवड्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, असं जोशी म्हणाले.
दरम्यान राज्यात सोमवारी ५,२१० नवीन रुग्णांचे निदान आणि १८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.परिणामी, राज्यातील बाधितांची एकूण संख्या २१,०६,०९४ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ८०६ आहे. राज्यात रविवारी ६,९७१ रुग्ण आणि ३५ बाधितांचा मृत्यू झाला. त्या तुलनेत सोमवारी नवीन बाधित तसेच मृत्यूंचे प्रमाण काहीसे कमी झाले. सोमवारी दिवसभरात ५,०३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. चिंताजनक! लस घेतली म्हणून रिलॅक्स राहणं पडू शकतं महागात; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
तर आतापर्यंत एकूण १९,९९,९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५७,९३,४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१३.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,०५४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १,८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २.४६ टक्के आहे. कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....