Corona Vaccine: कोरोना लस टोचल्यावर 'हे' तीन साईड इफेक्ट्स जाणवले तर समजून जा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 11:53 AM2021-02-03T11:53:27+5:302021-02-03T11:55:59+5:30
Corona Vaccine: शरजीलचं विधान समाजात तेढ निर्माण करणारं; त्यानं अंतर्मुख होऊन स्वत:च्या धर्माचा विचार करावा- शिवसेना खासदार अरविंद सावंत
मुंबई: गेल्या वर्षभरात कोरोना संकटानं संपूर्ण जगात थैमान घातलं. त्यानंतर आता लसीकरणास सुरुवात झाल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जग कोरोना संकटातून लवकर बाहेर येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र लसीकरण सुरू असतानाच लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट्सदेखील दिसू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. कोरोनावरील लस पूर्ण सुरक्षित आहे ना, ती टोचून घेतल्यावर साईड इफेक्ट्स तर दिसणार नाहीत ना, असे प्रश्न अनेकांच्या मनात पडले आहेत.
इशारा! पॅरासिटामोलच्या ओव्हरडोजमुळे लिवरला गंभीर धोका, जाणून घ्या साइड इफेक्ट्स....
कोरोना लसीकरण, त्याचे साईड इफेक्ट्स यांच्याबद्दल अमेरिकेचे सीडीसी चीफ आणि प्रख्यात महामारीतज्ज्ञ डॉक्टर फाऊची यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या मनातील शंका दूर होऊ शकतात. कोरोना लस टोचण्यात आल्यानंतर शरीरात साईड इफेक्ट्स दिसण्याची शक्यता आहे. याचा अर्थ शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होत आहे. कोणतीही लस टोचली गेल्यावर साईड इफेक्ट्स दिसून येणं अतिशय सामान्य बाब आहे, असं फाऊची यांनी सांगितलं.
अनेक वर्षांपासून सिगारेट ओढणाऱ्याचं पूर्ण शरीर पडलं पिवळं, डॉक्टरांनी सांगितलं कारण...
लसीकरणानंतरचे बहुतांश साईड इफेक्ट्स हलके किंवा मध्यम स्वरुपाचे असतात. ते २-३ दिवसांपर्यंत दिसतात आणि सहजपणे बरे होतात. लस टोचण्यात आल्यावर शरीराला संभाव्य धोका जाणवतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती काम सुरू करते. त्यामुळे जास्त त्रास होत नाही. केवळ थंडी लागते, थोड्या वेदना होतात. याचा अर्थ लस प्रभावी ठरत असून ती भविष्यात तुमच्या शरीरावर होणाऱ्या विषाणूंचा आघात परतवून लावण्यासाठी सज्ज होतेय असा होतो, अशी माहिती फाऊची यांनी दिली.
जगभरात खळबळ उडाली! एकाच रुग्णामध्ये दोन प्रकारचे कोरोना स्ट्रेन; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
सांधेदुखी आणि संधीवात सामान्य लक्षणं
लसीकरणानंतर मांसपेशी आणि सांध्यांमध्ये हलक्या स्वरुपाच्या वेदना होऊ शकतात. आतापर्यंत ज्यांना कोरोना लस देण्यात आली आहे, त्यांना या प्रकारचा त्रास जाणवला आहे. त्यामुळे ही सर्वसामान्य बाब आहे. काही वेळानं हा त्रास आपोआप बंद होतो. या कालावधीत शरीरातील रोगप्रतिकारशक्ती अँटीबॉडी तयार करते. सांधेदुखी, संधीवाताचा त्रास जास्त वेळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेता येऊ शकेल. अशा परिस्थितीत पेनकिलर्सचा वापर करता येईल. याशिवाय डोकेदुखीची समस्यादेखील उद्भवते. मात्र यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही.