कोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 04:25 PM2020-05-28T16:25:06+5:302020-05-28T16:33:24+5:30
लसीच्या मदतीने संशोधक कोरोना विषाणूंच्या प्रोटीन्सची चेन नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस जगभरासह भारतातही वाढत चाललं आहे. वेगवेगळ्या देशांतील शास्त्रज्ञ कोरोनावर लस किंवा औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या चाचण्यांचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून संशोधन सुरू आहे. असं सांगितले जात आहे की, लसीच्या मदतीने संशोधक कोरोना विषाणूंच्या प्रोटीन्सची चेन नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
अमेरिकेतील कंपनी नोवावॅक्सने ही लस तयार केली आहे. या लसीचे नाव NVX-CoV2373 आहे. भारत, चीन, इस्राईल, अमेरिका, ब्रिटेनसह अनेक देशांमध्ये लसीची चाचणी सुरू आहे. एका रिपोर्टनुसार दक्षिणेतील देशात या लसीचे ट्रायल होणार असून कोरोना विषाणूंवर लस किती परिणामकारक ठरू शकते हे पाहण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूंशी लढणारी ही लस इन्फुंएंजा विषाणूंवर आधारीत आहे. त्याला नॅनोफ्लू असं म्हणतात. या विषाणूची लस सुद्धा अमेरिकेतील नोवावॅक्स कंपनीने तयार केली होती. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये २ हजार ६५० लोकांवर या लसीचे ट्रायल करण्यात आले होते. हा लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा होता.
लसीची प्रक्रिया
चाचणीमध्ये वापरात असलेली लस कोरोना विषाणूंवर सरळ आक्रमण करण्यापेक्षा विषाणूंच्या स्पाईक प्रोटीनवर आक्रमण करेल. विषाणूंमधलं हेच स्पाईक प्रोटीन रुग्णाच्या शरीरात संक्रमण पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत असतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीमुळे व्यक्तीच्या इम्यून सिस्टिमच्या पेशींवर दबाव नियंत्रित राहील. जेणेकरून शरीराला व्हायरसशी लढता येईल. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीमुळे व्हायरस प्रोटीन लहान लहान तुकड्यांमध्ये संपूर्णपणे नष्ट होईल. याला नॅनोपार्टीकल्स असं म्हणतात. इम्यून सिस्टीम या पार्टिकल्सला सहज नष्ट करू शकते.
संशोधकांचं म्हणणं आहे की. कोरोनाच्या लसीत मेट्रिक्स-एम नावाचे नॅनो पार्टीकल्स असतील. त्याद्वारे शरीरातील विषाणूंचा धोका ओळखून इम्यून सिस्टीनला सिंग्नल देण्यात येईल. मग शरीरातील विषाणूंशी लढत असलेल्या पेशी व्हायरस प्रोटीन्सना संपवण्याासाठी फायदेशीर ठरतील.
'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा
मोठं यश! 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस मिळणार; ३ देशात पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी