CoronaVirus : 'या' कंपनीच्या लसीच्या चाचणीला मोठं यश ; ९४ टक्के लोकांमध्ये सकारात्मक परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 12:19 PM2020-07-01T12:19:25+5:302020-07-01T12:31:28+5:30
CoronaVirus Latest News Update : मानवी परिक्षणात ९४ टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते.
जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रसाराने हाहाकार पसरवला आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत कोणतीही लस किंवा औषध कोरोनावर मात करण्यासाठी तयार झालेली नाही. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा ५ लाखांवर गेला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस किंवा औषध तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काल कोरोना व्हायरसच्या लसीबाबत एक सकारात्मक माहिती समोर आली आहे.
अमेरिकेतील बायोटेक फर्म इनोवियो या कंपनीने लसीच्या परिक्षणाबाबत आनंदाची बातमी दिली आहे. कंपनाद्वारे करण्यात आलेल्या मानवी परिक्षणात ९४ टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते. या लोकांना चार आठवड्यात दोन इन्जेक्शन देण्यात आले होते. इनोवियोच्या या लसीला INO-4800 असं म्हणतात. व्यक्तीच्या डीएनएमध्ये ही लस इंजेक्ट केल्यानंतर कोविड 19 विरोधात रोगप्रतिकारकशक्ती वाढवता येऊ शकते.
या औषधाला सुईच्या माध्यामाने शरीरात टाकले जाते. यामुळे शरीरातील डीएनए व्हायरसशी लढण्याासाठी सक्रीय होतात. राष्ट्राध्यक्ष डोलाल्ड ट्रप यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारीपासून ऑपरेशन 'वारप स्पीड' च्या माध्यमातून लसीचे लाखो प्रयोग केले जाणार आहेत. इनोवियोचे सीईओ जोसेफ किम यांनी दिलेल्या माहितीनुसार ही एकमात्र अशी कोरोनाची लस आहे. जी एकावर्षापेक्षा अधिक कालावधीपर्यंत स्थिर राहू शकते.
लंडन स्कूल ऑफ हाइजीन एंड ट्रॉपिकल मेडिसिन्सने दिलेल्या माहितीनुसार कोविड 19 च्या लसीचे मानवी परिक्षण सुरू करण्यात आले आहे. अनेक देशांतील लसी या चाचणीच्या अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत. या लसींचा हजारो व्हेंटिलेटर्सवर वापर केला जाणार आहे. यूएस बायोटेक फर्म मॉडर्नद्वारे तयार करण्यात आलेली लस आणि ऑक्सफर्ड युनिवर्सिटीची एक्ट्राजेन्का या लसी अंतीम ट्प्प्यात आहेत. चीनमधील CanSinoBIO ही कंपनी लसी तयार करण्याच्या शर्यतीत पुढे आहे.
CoronaVirus News: कोरोनाची ३ नवी लक्षणं आढळली; 'हा' त्रास झाल्यास असू शकतो धोका
पावसाळ्यात विषाणूंच्या संक्रमणापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' सोपे उपाय