कोरोनाच्या लढ्याला मोठं यश! यशस्वी चाचणीनंतर आता ३० हजार लोकांवर लसीचे परिक्षण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 05:35 PM2020-07-15T17:35:36+5:302020-07-15T17:40:05+5:30
CoronaVirus News & Latest Updates : नॅशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ आणि मॉर्डना इंकमधील डॉ. फाउची यांनी ही लस विकसित केली आहे.
अमेरिकेतील कोरोनाच्या लसीने जगभराला आशेचा किरण दाखवला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आता लसीची मोठ्या स्तरावर चाचणी केली जाणार आहे. ही माहिती यूयॉर्क टाईम्सकडून प्रकाशित करण्यात आली आहे. या कंपनीच्या ट्रायलशी जोडलेल्या काही गोष्टी clinicaltrials.gov वर नमुद करण्यात आल्या आहेत. हे संशोधन २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. नॅशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ आणि मॉर्डना इंकमधील डॉ. फाउची यांनी ही लस विकसित केली आहे.
२७ जुलैपासून या लसीची चाचणी सुरू होणार आहे. तीस हजार लोकांवर हे मानवी परिक्षण केले जाणार आहे. ही लस कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून माणसांना वाचवू शकते. मंगळवारी ४५ लोकांवर टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोर्ट तपासण्यात आले. त्यात असं दिसून आलं की स्वयंसेवकांच्या शरीरात एंटीबॉडीजची वाढ झाली होती.
संशोधकांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस घेतलेल्या रुग्णांमध्ये जितके एंटीबॉडी दिसून आले तितकेच एंटीबॉडी कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आलेल्या रुग्णांमध्ये दिसून आले होते. आतापर्यंत लस कधी अंतीम टप्प्यात पोहोचणार याबाबत काही कल्पना देण्यात आलेली नाही. यावर्षाच्या अखेरपर्यंत लसीचे मानवी परिक्षण पूर्ण होऊ शकते.
चाचणीसाठी ही लस दोनदा दिली जाणार आहे. त्यामध्ये एका महिन्याचे अंतर असेल. या लसीचे कोणतेही साईच इफेक्ट्स नाहीत. लस घेतल्यानंतर फ्लू आणि ताप यांसारखी लक्षणं जाणवत आहेत. लस दिल्यानंतर अनेकांना थंडी वाजणे, ताप येणं, पोटदुखी अशा समस्यांचा सामना करावा लागला होता.
सुरूवातीच्या चाचणीत या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. अंतीम टप्प्यात ही लस किती परिणामकारक ठरते हे दिसून येईल. दरम्यान मॉर्डना इंक या कंपनीचे शेअर्स १५ टक्क्यांनी वाढले आहेत. यानंतरच्या मानवी परिक्षणात फक्त तरूणांनाच नाही तर वयस्कर लोकांनाही सामिल करून घेतलं जाणार आहे.
३० हजार लोकांवर होत असलेले हे मानवी परिक्षण सगळ्यात मोठ्या स्तरावरील मानवी चाचण्यांपैकी असणार आहे. याशिवाय ऑक्सफोर्ड युनिव्हरर्सिटी, जॉनसन एंड जॉनसन आणि भारतातील भारत बायोटेक या कंपनीचे क्लिनिकल ट्रायलचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. तसंच फायजर कंपनीही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास
कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण