'मेड इन इंडिया' लसीच्या दुसऱ्या चाचणीला सुरूवात होणार; लवकरच खुशखबर मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 04:24 PM2020-09-07T16:24:15+5:302020-09-07T16:25:18+5:30

CoronaVirus News & Latest Updates : ड्रग्स रेग्युलेटरी विभागाकडून स्वदेशी लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील  चाचणीस  मंजूरी मिळाली आहे.

Coronavirus vaccine updates india vaccine covaxin trial bharat boitech vaccine | 'मेड इन इंडिया' लसीच्या दुसऱ्या चाचणीला सुरूवात होणार; लवकरच खुशखबर मिळणार 

'मेड इन इंडिया' लसीच्या दुसऱ्या चाचणीला सुरूवात होणार; लवकरच खुशखबर मिळणार 

googlenewsNext

भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना संक्रमणाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. मागिल २४ तासात कोरोनाच्या संक्रमणामुळे आतापर्यंत ९० हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ब्राझिलला मागे टाकत भारत दुसऱ्या क्रमाकांवर आला आहे. जगभरात कोरोना लसीच्या चाचण्या सुरू आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्स रेग्युलेटरी विभागाकडून स्वदेशी लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील  चाचणीस  मंजूरी मिळाली आहे. या लसीचे अंतिम टप्प्यातील ट्रायल ७ सप्टेंबर म्हणजेच आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे.  

आरोग्य सेवेतील डायरेक्टर जनरल यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ सप्टेंबरला आरोग्य तज्ज्ञांची व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. यादरम्यान भारत बायोटेकच्या लसीबाबत चर्चा करण्यात आली. तसंच या लसीच्या दुसऱ्या चाचणीसाठी  मान्यता देण्यात आली आहे. रिपोर्ट्नुसार चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी ३८० स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. डोज दिल्यानंतर चार दिवसांपर्यंत  डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली स्वयंसेवकांना ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून लसीच्या साईड इफेक्टसबाबत माहिती मिळवता येऊ शकते. 
भारत बायोटेकच्या लसीचे भारतातील वेगवेगळ्या भागात चाचण्या सुरू  झाल्या आहेत.

इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसमधील चाचणीतील मुख्य तज्ज्ञ डॉ. ई. वेकंट राव यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील चाचणीत या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आले नाही. भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या सहयोगानं ही लस  तयार करण्यात आली आहे. कोवॅक्सिन या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या एकूण १२ केंद्रांवर ट्रायल सुरू आहेत. नागपूरमध्ये ५५ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली होती. अनेकांना ही लस दिल्यानंतर सौम्य तापाची लक्षणं दिसून आली आहेत.

या आठवड्यापासूनच रशियाची लस उपलब्ध होण्याची शक्यता

कोरोना विषाणूच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या फैलावामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी रशियाने कोरोनाविरोधातील लस विकसित केल्याचा दावा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता रशियाने अजून एक खुशखबर दिली आहे. नागरिकांना या आठवड्यापासूनच कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे रशियाने सांगितले आहे. रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या आठवड्यापासून कोरोना विषाणूविरोधातील स्पुटनिक V ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. ही लस रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी लाँच केली होती.

रशियन वृत्तसंस्था TASS ने रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमधील डेप्युटी डायरेक्टर डेनिस लोगुनोव्ह यांचया हवाल्याने सांगितले की स्पुटनिक V या लसीचा आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीनंतर व्यापक प्रमाणात उपयोग केला जाईल. आरोग्य मंत्रालय या लसीची चाचणी घेणार आहे. त्यासाठी आम्ही लवकरच परवानी घेऊ. त्यांनी सांगितले की सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध करून देण्याची एक निश्चित प्रक्रिया आहे. १० ते १३ सप्टेंबरदरम्यान नागरिकांच्या वापरासाठी कोरोनावरील लसीची परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांना लस दिली जाईल.

कोरोनावरील ही लस मॉस्कोमधील गमलेया रिसर्च इंस्टिट्युटने रशियन आरोग्य मंत्रालयासोबत मिळून एडेनोविषाणूला बेस बनवून तयार केली आहे. या लसीच्या दोन चाचण्या ह्या या वर्षी जून-जुलैमध्ये करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ७६ स्वयंसेवक सहभागी झाले होते. ही लस दिल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात १०० टक्के अँटीबॉडी विकसित झाल्या होत्या.

 हे पण वाचा-

खुशखबर! ३ महिन्यानंतर आपोआप चांगली होताहेत कोरोनामुळे संक्रमित झालेली फुफ्फुसं, तज्ज्ञांचा दावा 

CoronaVirus : चिंताजनक! २०२३ पर्यंत कोरोना विषाणू पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Web Title: Coronavirus vaccine updates india vaccine covaxin trial bharat boitech vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.