CoronaVirus : आता ग्लोव्हज घातल्याने सुद्धा होऊ शकतो कोरोना, जाणून घ्या कसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:00 PM2020-04-07T17:00:48+5:302020-04-07T17:03:03+5:30
नर्सच्या मते ग्लोव्हज घातल्यामुळे कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. अशा परिस्थीतीत लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी मास्क, ग्लोव्हज घालण्याचं आवाहन केलं जात आहे. अशात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या अमेरिकेतील एका नर्सने धक्कादायक खुलासा केला आहे. या नर्सच्या मते ग्लोव्हज घातल्यामुळे कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
हा व्हिडीओ ज्या अमेरिकन नर्सने तयार केला आहे. तिचं नाव मॉली लक्सी आहे. मॉली या व्हिडीओमध्ये क्रॉस कंटॅमिनेशनबद्दल सांगत आहे. यांनी सांगितलं आहे की तुम्ही ग्लोव्हज घालत आहात ही चांगली गोष्ट आहे पण कोरोना ग्लोव्हजमुळे सुद्धा पसरू शकतो. सुरुवातीला त्यांनी टॉयलेट पेपरला हात लावला. याचे किटाणू ग्लॉव्हजला तसेच चिकटून राहिले नंतर त्यांनी त्याच हातांनी फोन उचलला. फोनवर बोलणं झाल्यानंतर नाकाला खाज आल्यामुळे नाकाला हात लावला. त्यानंतर परत त्यांना फोन येतो. त्या फोनवर आपल्या आईशी बोलतात. नंतर आपल्या कार जवळ जाऊन खिडकी उघडून ग्लॉव्हज फेकून देतात.
great example of how this works.....be smart... https://t.co/uogaizqg0B
— Will E (@willyeat) April 6, 2020
ग्लॉव्हज घालून कोणत्याहीप्रकारे संरक्षण होत नाही, यामागे कोणतंही वैज्ञानिक कारण नाही. जरी तुम्ही ग्लॉव्हज घातल असाल तर सतत हात धुतं रहा, हातांना स्वच्छ ठेवा आणि ग्लॉव्हज वापरून झाल्यावर कचरापेटीत टाकून द्या. असं या नर्स महिलेने व्हिडीओतून लोकांना सांगितलं आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला २० लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहे. मॉली नर्सचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसून येत आहे.( हे पण वाचा-CoronaVirus : कोरोनाची लस येईपर्यंत बचाव करण्यासाठी 'ही' पध्दत ठरेल प्रभावी)