काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 04:47 PM2020-09-09T16:47:18+5:302020-09-09T18:39:11+5:30
तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार व्हिटामीन डी फक्त रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवत नाही तर शरीरातील इंफेक्शनशी लढत असलेल्या टी सेल्सची संख्या वाढवण्यासाठी तसंच मॅक्रोफेजिस वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं.
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूनं कहर केला आहे. कोरोनाचं संक्रमण होत असलेल्यांच्या संख्येत वेगानं वाढ होत आहे. एका रिपोर्टनुसार ज्या लोकांच्या शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता असते. अशा लोकांमध्ये कोरोना संक्रमण पसरण्याचा धोका वेगानं वाढतो. व्हिटामीन डी ची कमतरता असल्यानं कोरोनाची लागण होण्याचा धोका ६० टक्क्यांनी वाढतो. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार व्हिटामीन डी फक्त रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवत नाही तर शरीरातील इंफेक्शनशी लढत असलेल्या टी सेल्सची संख्या वाढवण्यासाठी तसंच मॅक्रोफेजिस वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं.
यूनिवर्सिटी ऑफ शिकागोच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे जवळपास २० टक्के लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. ज्या लोकांमध्ये व्हिटामीन डी ची कमतरता नव्हती अशा लोकांपैकी १२ टक्के लोकांना संक्रमणाचं शिकार व्हावं लागलं. काही आरोग्य तज्ज्ञ व्हिटामीन डी आणि कोरोनाशी यांच्यातील संबंधांबाबत साशंक आहेत. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्याची किरण हा व्हिटामीन डी चा प्रमुख स्त्रोत आहे.
त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करून सुर्याच्या किरणं शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढतात. कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर आलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना डॉक्टरांकडून व्हिटामीन सी च्या गोळ्या दिल्या जात आहेत. गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या व्यक्तीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ही औषधं घ्यायला हवीत. व्हिटामीन सी योग्य प्रमाणात असल्यास कोरोना चा धोका कमी करता येऊ शकतो. ही बाब सिद्ध करण्यासाठी वैद्यकिय परिक्षण केले जात आहेत.
व्हिटामीनच्या कमतरेमुळे ताप येणं, थकवा येणं, हाडं आणि पाठीत वेदना, मानसिक ताण, केस गळणं, मासंपेशीचं वेदना, अशी लक्षणं जाणवतात. याशिवाय हद्याचे ठोके वाढणं अशा समस्या उद्भवतात. आहारात काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढू शकता.
संक्रणापासून बचावासाठी व्हिटामीन डी घरीच राहून 'असं' मिळवा
मशरूम : मशरुमचा आहारात समावेश केल्यामुळे व्हिटामीन डी स्तर व्यवस्थित राहतो. मशरूमच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही व्हिटामीन डी मिळवू शकता.
पनीर : पनीर अनेकांना खायला खूप आवडतं. त्यात व्हिटामीन डी मोठ्या प्रमाणावर असते तर नियमीत पनीरचं सेवन केल्यास शरीरातील व्हिटामीन डी ची कमतराता भरून काढण्यास मदत होईल.
दही : दुधापेक्षा दही पचण्यास हलके असते. दह्याच्या सेवनाने पचनाशी निगडीत समस्या दूर होऊन शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण होते.
सोयामिल्क : सोयामिल्कच्या सेवनाने शरीला व्हिटामीन डी मिळतं. याशिवाय यात अनेक पोषक घटक असतात. सोयामिल्कमध्ये आयर्न, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर असतात.
हे पण वाचा-
अरे व्वा! तिन्ही 'मेड इन इंडिया' कोरोना लसींचा पहिला टप्पा यशस्वी; लवकरच लस येणार
मक्याच्या चमकदार धाग्याचे 'हे' फायदे वाचाल तर फेकण्याआधी १० वेळा विचार कराल